ETV Bharat / bharat

भारतात का साजरा केला जातो राष्ट्रीय गणित दिवस?

author img

By

Published : Dec 22, 2020, 12:05 PM IST

देशाच्या तरुण पिढीमध्ये गणिताचे शिक्षण घेण्यासंबंधी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यासाठी अनेक पुढाकार घेतले जातात, या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. या दिवशी गणित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिबिरांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. गणित आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी अध्यापन साहित्याचा (टीएलएम) विकास, उत्पादन आणि प्रसार यावर प्रकाश टाकला जातो.

national mathematics day 2020
भारतात का साजरा केला जातो राष्ट्रीय गणित दिवस?

नवी दिल्ली - भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कर्तृत्वाची जाण व्हावी, यासाठी राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला होता.

२०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २२ डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केले. राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यामागील मुख्य हेतू म्हणजे माणुसकीच्या विकासात गणिताच्या महत्त्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे.

हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : सामनावीर खेळाडूला मिळणार 'जॉनी मुलघ' पदक

देशाच्या तरुण पिढीमध्ये गणिताचे शिक्षण घेण्यासंबंधी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यासाठी अनेक पुढाकार घेतले जातात, या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. या दिवशी गणित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिबिरांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. गणित आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी अध्यापन साहित्याचा (टीएलएम) विकास, उत्पादन आणि प्रसार यावर प्रकाश टाकला जातो.

राष्ट्रीय गणित दिवस कसा साजरा केला जातो?

  • राष्ट्रीय गणित दिन भारतातील विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा केला जातो.
  • इतकेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय संस्था युनेस्को (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था) आणि भारत यांनी गणित शिकण्यासाठी व समजून घेण्यासाठी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे.
  • याखेरीज विद्यार्थ्यांना गणिताचे शिक्षण देण्यासाठी आणि जगभरातील विद्यार्थी व अभ्यासकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी विविध पावले उचलली गेली आहेत.
  • भारतातील सर्व राज्ये राष्ट्रीय गणित दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. आज शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विविध स्पर्धा आणि गणिताचे प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या वेळी, संपूर्ण भारतभरातील विद्यार्थी या कार्यक्रमांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये भाग घेतात.

श्रीनिवास रामानुजन कोण होते आणि गणितातील त्यांचे कार्य महत्त्वाचे का आहे?

⦁ वयाच्या १२ व्या वर्षी औपचारिक शिक्षणाचा अभाव असूनही श्रीनिवास यांनी त्रिकोणमितीचे अनेक प्रमेय विकसित केले.

⦁ १९०४मध्ये रामानुजन यांनी कुंभकोणम (तामिळनाडू) येथील शासकीय कला महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. पण इतर विषयांमध्ये चांगली कामगिरी न केल्यामुळे ही शिष्यवृत्ती त्यांना गमवावी लागली.

⦁ १४व्या वर्षी रामानुजन घराबाहेर पळून गेले आणि मदुरैच्या पचैयाप्पा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तथापि, ते तिथे पदवी मिळवू शकला नाहीत.

⦁ त्यानंतर, रामानुजन यांनी गरीबीत जीवन जगताना गणिताचे स्वतंत्र संशोधन केले. तथापि, लवकरच रामानुजन चेन्नईच्या गणिताच्या वर्तुळात त्यांच्या निदर्शनास आले.

⦁ १९१२मध्ये भारतीय गणित संस्थेचे संस्थापक रामास्वामी अय्यर यांनी रामानुजन यांना मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये लिपिक पद मिळवण्यास मदत केली. त्यानंतर रामानुजन यांनी ब्रिटीश गणितज्ञांकडे आपले काम पाठवण्यास सुरुवात केली.

⦁ १९१३मध्ये केंब्रिजचे गणितज्ञ जी.एच. हार्डी यांनी त्यांना प्रमेय आणि इनफिनिटी मालिकेसंदर्भातील कामांमुळे लंडनला बोलावले. तेव्हा रामानुजन यांचे नावलौकिक झाले.

⦁ रामानुजन १९१४मध्ये ब्रिटनमध्ये दाखल झाले, तेथे हार्डी यांनी त्यांना केंब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला.

⦁ १९१७मध्ये रामानुजन यांना लंडन मॅथेमेटिकल सोसायटीचे सदस्य म्हणून निवडले गेले. १९१८मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो बनले. सर्वात लहान वयात ही कामगिरी करणारे ते पहिले व्यक्ती ठरले.

⦁ १९१९मध्ये ते भारतात परत आले. भारतात परत आल्यानंतर रामानुजन यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या ३२ व्या वर्षी १९२० मध्ये त्यांचे निधन झाले.

रामानुजन यांच्याबद्दल रोचक तथ्य -

⦁ रामानुजन १३ वर्षांचे असताना त्यांनी मदतीशिवाय त्रिकोणमितीचा सराव केला होता.

⦁ शाळेत रामानुजन यांचे कोणीही मित्र नव्हते. कारण त्यांचे साथीदार त्यांना शाळेत क्वचितच समजत असत आणि गणिताच्या कौशल्यामुळे नेहमीच भयभीत राहत होते.

⦁ जरी त्यांनी नेहमी गणितामध्ये अपवादात्मक कामगिरी केली असली, तरी तारुण्यात ते पदवी मिळवू शकले नाहीत.

⦁ कागद महाग होता म्हणून रामानुजन अनेकदा पाटी वापरायचे.

⦁ केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून निवडले गेलेले ते पहिले भारतीय होते.

⦁ १९०९ मध्ये जेव्हा रामानुजन यांचे लग्न झाले, तेव्हा ते १२ वर्षांचे होते आणि त्यांची पत्नी जानकी अवघ्या दहा वर्षांची होती.

⦁ रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळवणारे श्रीनिवास रामानुजन हे एकमेव भारतीय होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.