नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रचार जोमाने सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारासाठी (PM Modi Gujarat Visit) 27 आणि 28 नोव्हेंबरला पुन्हा गुजरातमध्ये येणार आहेत. यावेळी ते दक्षिण गुजरात, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि सौराष्ट्र मध्ये प्रचार करणार आहेत.
सुरतमध्ये देखील रॅली : अहमदाबाद राज्यातील निवडणूक प्रचारासाठी आता अवघे तीन दिवस उरले आहेत. या दरम्यान ते 6 हून अधिक सभांना संबोधित करतील (PM Modi Public Meeting in Gujarat). पंतप्रधान कामरेज, अल्पाड, कटरगाम, वराछा आणि करंज मतदारसंघांत संयुक्त जाहीर सभेला संबोधित करतील. तसेच ते पाटीदारांचा बालेकिल्ला असलेल्या सुरतमध्ये देखील रॅली काढणार आहेत. या आधीही पंतप्रधानांनी राज्यात अनेक सभा घेऊन जोमाने प्रचार केला आहे.
तिहेरी लढत : गुजरातमध्ये यंदा तिहेरी लढत होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. निवडणुकीत भाजप आपलाच जुना विक्रम मोडण्यासाठी, काँग्रेस आपला २७ वर्षांचा वनवास पूर्ण करण्यासाठी आणि आम आदमी पक्ष राज्यात आपला पाय रोवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. आता राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार, याचा निर्णय ८ डिसेंबरलाच होणार आहे.