नवी दिल्ली narendra modi to burn Effigy ravana पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (24 ऑक्टोबर) द्वारका सबसिटीच्या सेक्टर 10 येथील रामलीला मैदानावर रावणाच्या प्रतिकात्मक दहनासाठी येणार आहेत. रामलीला समितीचे निमंत्रक राजेश गेहलोत यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे. यापूर्वी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केले होते. दरम्यान, आज संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान पंतप्रधान मोदी द्वारकेत येणार असल्याचं सांगण्यात येतंय.
मागील काही दिवसांपासून द्वारका सेक्टर 10 मध्ये आयोजित 11 व्या भव्य रामलीलामध्ये पंतप्रधान येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. परंतु शेवटपर्यंत त्याची पुष्टी करण्यात आली नव्हती. अखेर सोमवारी (23 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा ही माहिती देण्यात आली. दरम्यान, रामलीलाची सुरूवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या दिल्ली राज्यानं येथे शौर्य जागरण यात्रा काढली होती. त्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसंच रामलीला मैदानावर 10,000 लोकं बसण्याची क्षमता असून रामलीला पाहण्यासाठी दूरदूरहून लोकं येथे येतात.
महिनाभरात पंतप्रधानांचा दुसरा दौरा : काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी हे द्वारका दौऱ्यावर आले होते. त्यानंतर त्यांचा हा दुसरा दौरा असणार आहे. यापूर्वी त्यांनी द्वारकेत एका मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन केलं होतं. याशिवाय द्वारका सेक्टर 23 च्या नव्यानं बांधलेल्या मेट्रो स्टेशनचंही उद्घाटन तेव्हा करण्यात आलं. दरम्यान, पंतप्रधानांच्या आगमनाची घोषणा झाल्यानंतर सकाळपासूनच परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तसंच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक मार्ग वळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा -
- PM Modi Inaugurate Namo Bharat Rail : देशातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; काय आहेत या रेल्वेची वैशिष्ट्ये?
- Maadi Song Out : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं 'हे' गाणं; पाहा व्हिडिओ...
- Pramod Mahajan Skill Development Centers : राज्यातील 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार उद्घाटन