नैनिताल (उत्तराखंड) : नैनिताल उच्च न्यायालयाने आज एक महत्वाचा निर्णय दिला. एका प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने एका विवाहित महिलेला लिव्ह-इन पार्टनरसोबत राहण्याची परवानगी दिली. विशेष म्हणजे ही महिला दोन मुलांची आई आहे.
पतीने दाखल केली होती याचिका : उत्तराखंड हायकोर्टात आज डेहराडूनमधील एका पतीच्या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेद्वारे पतीने कोर्टाला विनंती केली होती की, त्याची पत्नी ऑगस्ट 2022 पासून बेपत्ता आहे. तिचा शोध घेतल्या जावा. या प्रकरणी सुनावणी करताना वरिष्ठ न्यायमूर्ती मनोज कुमार तिवारी आणि न्यायमूर्ती पंकज पुरोहित यांच्या आदेशानुसार पोलिसांनी महिलेला आज न्यायालयात हजर केले.
महिलेने पतीवर लावले हे आरोप : सुनावणीदरम्यान महिलेने न्यायालयात निवेदन दिले की, ती 7 ऑगस्ट 2022 पासून फरीदाबादमधील एका व्यक्तीसोबत लिव्ह - इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. महिलेने सांगितले की, तिला त्याच व्यक्तीसोबत राहायचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती त्या व्यक्तीला भेटली होती. महिलेचा आरोप आहे की, तिचा पती तिला मारहाण करत असे. त्याचे तिच्याशी वागणे योग्य नव्हते.
विवाहित महिलेला लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी : 4 मे 2023 रोजी न्यायालयाने एसएसपी डेहराडून आणि एसएसपी फरीदाबाद यांना महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज पोलिसांनी महिलेला न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने या महिलेला तिच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याची परवानगी दिली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? : झाले असे की, डेहराडूनमध्ये राहणाऱ्या एका पतीने मे महिन्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्याने म्हटले की त्यांची पत्नी 7 ऑगस्ट 2022 पासून बेपत्ता आहे. ती त्यांचा दहा वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या मुलीला सोडून गेली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करूनही ती अद्याप सापडलेली नाही. त्यामुळे तिला लवकरात लवकर शोधून न्यायालयात हजर करावे. तसेच ती ज्याच्यासोबत सापडेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
हे ही वाचा :