नैनिताल - कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग पसरू नये, म्हणून अनेक राज्यांनी लॉकडाऊन, निर्बंध आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. पण अनेक नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. उत्तराखंडमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे 4 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी नागपुरातून नैनितालला पोहोचलेला 19 वर्षीय पर्यटक (Nainital Covid Positive Tourist) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तेथून पळून गेल्याची घटना घडली. ही बाब आरोग्य विभाग व पोलिसांना कळवताच एकच खळबळ उडाली. सध्या तरुणाचा शोध सुरू आहे.
नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी हा तरुण कुटुंबासह नागपुरातून नैनितालला आला होता. हा तरुण आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये थांबला होता. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याला आरटी पीसीआर अहवाल दाखवणे आवश्यक आहे. ज्यासाठी तरुणाची बीडी पांडे रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली आणि तपासणीत युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. रिपोर्ट मिळण्याआधीच युवक रुग्णालयातून पळून गेला. त्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने तरुणाचा शोध सुरू केला. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने पोलीस व प्रशासनाला माहिती दिली. त्याचवेळी पोलीस आणि प्रशासनाचे पथक तरुणाच्या शोधात आहे.
कोरोनाचा प्रसार -
उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणू अनियंत्रित होऊ लागला आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी 118 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. उत्तराखंडमध्येही ओमायक्रॉन प्रकाराचे 4 रुग्ण आढळून आले आहेत, ही चिंतेची बाब आहे. तसेच एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तराखंड आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण 3,45,205 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3,31,184 रुग्ण बरे झाले आहेत.
हेही वाचा - Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने