ETV Bharat / bharat

बजरंग पुनियाकडून डोपिंग टेस्टकरिता आलेल्या टीमची पोलखोल, व्हिडिओ शेअर करत 'या' भाजपा नेत्यावर केला आरोप - नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी

Bajrang Punia dope test from expired Kit: कुस्तीपटू बजरंग पुनियानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीच्या (NADA) कार्यशैलीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. बजरंग पुनियानं सांगितलं की, डोप चाचणी घेण्यासाठी आलेली टीम स्वतःसोबत एस्पायरी कीट घेऊन आली होती.

Bajrang Punia dope test from expired Kit

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 7:30 AM IST

कुस्तीपटू बजरंग पुनिया

सोनीपत (हरियाणा) Bajrang Punia dope test from expired Kit : नाडाच्या टीमनं चाचणीसाठी आणलेलं कीट हे कालबाह्य झाल्याचं बजरंग पुनियाच्या लक्षात आलं. यानंतर बजरंगनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत ही संपूर्ण घटना सांगितली.

खेळाडूंना जाणीवपूर्वक अडकवल जातं : बजरंग पुनिया यानं डोप चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कीटची उपकरणं एकामागून एक दाखवली. त्या सर्वांची मुदत संपली आहे. डोप टेस्टरनं बजरंग पुनियाला व्हिडिओत स्वतःला न दाखवण्याचं आवाहन केलंय. यानंतर पुनिया म्हणतो की, यात तुमची चूक नाही. पण तुमच्या वर जे आहेत ते जाणीवपूर्वक खेळाडूंना अडकवत आहेत.

कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी म्हटले की, नाडाचे लोक डोप टेस्ट करायला आले आहेत. मग ते म्हणतील की खेळाडू डोप सेवन करतात. त्यांनी मुदत संपलेल्या किट आणल्या आहेत. या कीटची मुदत 2 फेब्रुवारी रोजी संपली आहे. आम्ही आंदोलनाला बसलो आहोत तेव्हापासून ते गोळा करण्यासाठी आलेले हे आठवे किंवा नववे टेस्ट्स आहेत. जेव्हा आम्ही कोणतीही स्पर्धा खेळत नव्हतो, ही तेव्हाची गोष्ट आहे. जर खेळाडूंनी नमुने दिले नाहीत तर ते त्यांच्यावर बंदी घालतात. तुम्ही एखाद्या नवख्या मुलाची चाचणी करत असाल तर तो हे तपासणारही नाही. माझ्याकडे डॉक्टरांची टीम आहे, त्यांनी हे तपासलं.

मी नावं घेणार नाही. ब्रिजभूषणच्या लोकांनी या प्रकरणातील एका मुलीलाही सांगितलं आहे. तिला जबरदस्तीनं यात फसवण्यात आलंय, कारण ब्रिजभूषण यांच्यासमोर तिनं पराभव स्वीकारला नाही. हे लोक कुणाला तरी पैसे देत आहेत. हे लोक घाबरवत आहेत. यानंतर आता डोपची पाळी आलीय. डोपचे विक्रेते घरात आले असतील, काळजी घ्या, असं त्यांनीच सांगितलं. - बजरंग पुनिया, कुस्तीपटू

का होते खेळाडूंची चाचणी : बजरंग पुनियानं सर्व खेळाडूंना आवाहन केलं की, जर डॉक्टरांची टीम तुमची डोप चाचणी घेण्यासाठी आली तर त्यांची कीट तपासा. तुमची चाचणी कालबाह्य झालेल्या कीटमधून घेतली जाऊ शकते. यामुळं खेळाडूंचं करिअर खराब होऊ शकतं, असे तो म्हणाला. कोणत्याही खेळाडूची डोप चाचणी कधीही घेतली जाऊ शकते. या चाचण्या नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी किंवा WADA (वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी) द्वारे केल्या जातात. मुळात डोप टेस्ट ही खेळाडूंच्या शरीरात बंदी असलेले पदार्थ शोधण्यासाठी केली जाते.

हेही वाचा :

  1. VINESH PHOGAT : कुस्तीपटू योगेश्वर दत्तवर संतापली विनेश फोगट, म्हणाली योगेश्वर कुस्तीचा 'जयचंद आणि 'विषारी साप'
  2. Wrestlers Protest : ब्रिजभूषण सिंह दिल्ली पोलिसांच्या एसआयटीसमोर हजर, स्वत:वरील सर्व आरोपांचे केले खंडण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.