कोडागु (कर्नाटक) - कोडागू जिल्ह्यातील माडीकेरी तालुक्यातील बेतागेरी ग्रामपंचायतीच्या हेरावनाडू गावात हे आश्चर्यकारक दृष्य ( Mysterious Case ) दिसत आहे. गावाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या परिसरात संततधार सुरू असते. अन्यत्र लख्ख सूर्यप्रकाश पडलेला असतानाही या झाडातून मात्र पावसाच्या धारा ( Raining Tree ) पडत असल्याचे दिसत राहते. कर्नाटकमधील ( Karnataka ) कोडागू येथे गेल्या काही आठवड्यांपासून ही आश्चर्यकारक घटना दिसत आहे.
आजुबाजुला लख्ख उन - झाडाच्या आजुबाजुला सर्वत्र उष्ण वातावरण आणि उन पडलेले असले तरी झाडासभोवती 10 स्क्वेअर फूट परिसरात संततधार पडत राहते. हा चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांची पावले आता या झाडाच्या परिसराकडे वळत आहेत. येथे बिल्वपत्राच्या झाडासारखे दिसणारे एक झाड आहे. भगवान शंकराच्या पूजेसाठी या झाडाची पाने वापरली जातात. फक्त याच झाडातून पाणी पडत आहे. हे पाणी या झाडातून येत आहे की आकाशातून येत आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. स्थानिक ग्रामपंचायतीने हे पाणी गोळा करून प्रयोगशाळेत पाठवले आहे.
पानाफांद्यांतून गळतेय पाणी - झाडाच्या छोट्या फांद्यांतून फवारणीसारखे पाणी गळते, याचे गावातील लोकांना आश्चर्य वाटत आहे. वाऱ्याच्या वेगाने ही गोष्ट घडत आहे. या झाडापासून 500 मीटर अंतरावर देवरा काडू (पवित्र वन) आहे. जिथे देवी भद्रकाली राहते. हा देवीचा चमत्कार आहे, असे, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पुजारी, वन अधिकाऱ्यांची मते भिन्न - गावकऱ्यांनी मंदिरातील पुजाऱ्यास या घटनेबद्दल विचारले. या पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे झाड बिल्वपत्राचे आहे. कदाचित येथे पूर्वी शिवलिंग असावे अथवा धबधबा असावा. पुजाऱ्याने हे सांगितल्याने ग्रामस्थ भयचकित झाले आहे. ही बाब आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण तज्ज्ञ आणि हवामान विभागाच्या तज्ज्ञांच्या निदर्शनास आणून दिली असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊ असे म्हटले आहे. काही वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की झाडांच्या काही प्रजातींमध्ये या प्रकारची पाण्याची गुणवत्ता असते आणि त्या प्रकारातीलच हे झाड असावे.
हेही वाचा - Rajya Sabha Election 2022 : 'सर्व गणितं ठरलेली, विजय आमचाच' होणार- संजय राऊत