कॅलिफोर्निया : इलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटर या सोशल मीडिया कंपनीची सूत्रे हाती घेतल्यापासून रोज नवनवीन निर्णयांच्या बातम्या येत आहेत. मात्र, आता एक अशी बातमी आली आहे, ज्यामुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना समस्या निर्माण होऊ शकतो. ही बातमी ट्विटरमधील कर्मचारी कपात संदर्भात आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क हे कंपनीच्या जवळपास 3700 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहेत. या निर्णयामुळे ट्विटर या सोशल मीडिया कंपनीचे कर्मचारी जवळजवळ निम्म्याने कमी होतील.
मस्क ट्विटरचे धोरण संपविण्याचा विचार : ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांना शुक्रवारी टाळेबंदीबद्दल सूचित करण्याची योजना आहे. बाधित कामगारांना 60 दिवसांचा पगार दिला जाऊ शकतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मस्क ट्विटरचे धोरण संपविण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना 'कायमचे' घरून काम करण्याची परवानगी होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्विटर विकत घेण्याच्या करारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न मस्कने अयशस्वी झाल्यानंतरच त्याने मोठ्या प्रमाणावर टाळेबंदीच्या धोरणाचा विचार करण्यास सुरुवात केली.
कंटेंट मॉडरेशन कौन्सिलही तयार करणार असल्याची घोषणा : काही दिवसांपूर्वी मस्कचे सल्लागार जेसन कॅलाकॅनिस यांच्या लीक झालेल्या कॅथिल ईमेलवरून उघड झाले आहे. मस्क यांनी टेस्ला येथे बनवलेल्या दीर्घकालीन योजना तूर्तास पुढे ढकलल्याची चर्चा अमेरिकन माध्यमांमध्ये आहे. गेल्या आठवड्यात इलॉन मस्कच्या अधिग्रहणानंतर ट्विटरमध्ये काही बदल झाले आहेत. मस्कने ट्विटर ब्लू टिकसाठी नवीन पॉलिसी जाहीर केली आहे. या आठवड्याच्या अखेरीस संपादन सुविधा सर्वांसाठी खुली करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. मस्क यांनी 'कंटेंट मॉडरेशन कौन्सिल'ही तयार करणार असल्याची घोषणा केली आहे.
कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम : ट्विटरच्या व्यवस्थापकाने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वेळ काम करण्यास सांगितले आहे. तसेच, ट्विटर आता ब्लू टिकसाठी प्रत्येक युजर्सकडून 8 डॉलर म्हणजेच 660 रुपये प्रति महिना शुल्क आकारणार आहे. ही सुविधा सुरू करण्याची तयारी जोरात सुरू असून या कामासाठी येथील अभियंत्यांना अतिरिक्त काम करण्यास सांगितले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे 07 नोव्हेंबरपर्यंत ब्लू टिक पेड फीचर लाँच करण्याची शक्यता आहे.