ETV Bharat / bharat

Murugha math seer अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणी मुरुगा मठाधिपतीला अटक, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

author img

By

Published : Sep 2, 2022, 9:28 AM IST

Updated : Sep 2, 2022, 9:54 AM IST

मुरुघा मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांना हायस्कूलच्या मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली Murugha math seer. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. चौकशीनंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी अटक झाल्यानंतर लगेचच सूत्रांनी सांगितले की, रात्री सर्व पोलिसी कारवाई करण्यात आली.

Murugha math seer
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणी मुरुगा मठाधिपतीला अटक

चित्रदुर्ग, कर्नाटक - मुरुघा मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांना हायस्कूलच्या मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. चौकशीनंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले Murugha math seer . गुरुवारी अटक झाल्यानंतर लगेचच सूत्रांनी सांगितले की, रात्री सर्व पोलिसी कारवाई करण्यात आली.

आज सकाळी छातीत दुखू लागल्याने या महाराजाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Karnataka | Chief pontiff of Sri Murugha Mutt Shivamurthy Murugha Sharanaru was taken to district hospital from Chitradurga district jail after he complained of chest pain

    He has been sent to 14-day judicial custody in the case of sexual assault of minor girls pic.twitter.com/Zxso5AsDxV

    — ANI (@ANI) September 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल कुमार यांनी राज्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली लिंगायत महाराजांपैकी एक असलेल्या लिंगायत धर्मगुरूची अज्ञातस्थळी चौकशी केली. नंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर निवासस्थानी प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली, असे चित्रदुर्गाचे पोलिस अधीक्षक परशुराम यांनी सांगितले.

याआधी गुरुवारी, दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर येथील स्थानिक न्यायालयाने 2 सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. म्हैसूर शहर पोलिसांनी लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या काही कलमांतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली त्याच्या एफआयआर दाखल केला होता. जिल्हा बाल संरक्षण युनिटच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मठाच्या वसतिगृहाच्या वॉर्डनसह एकूण पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. पोलिसांनी गुरुवारी वॉर्डनची चौकशी केली.

दोन मुलींनी म्हैसूरमधील एका एनजीओशी संपर्क साधला होता आणि कथित अत्याचाराची कथन केली होती, त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण चित्रदुर्ग येथे हलवण्यात आले कारण ते कथित गुन्ह्याचे ठिकाण होते. या महाराजावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याने आधी दावा केला होता की त्याच्यावरील आरोप हे दीर्घकाळ रचलेल्या कटाचा भाग आहेत. तो कायद्याचे पालन करणारा आहे आणि तपासात सहकार्य करेल. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. या अटकेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चित्रदुर्गात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

हेही वाचा - Farmer Women Murder मेळघाटात शेतकरी महिलेची बलात्कारानंतर हत्या; आरोपीला अटक

Last Updated : Sep 2, 2022, 9:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.