ETV Bharat / bharat

संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांची क्रूर हत्या!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 8:56 PM IST

Murder Of Six From Same Family : तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तपासानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी आठवड्याभरात वेगवेगळ्या दिवशी या लोकांची हत्या केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

murder
murder

निजामाबाद Murder Of Six From Same Family : तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातून एक भीषण घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील सहा जणांची आठवडाभरात निर्घृण हत्या करण्यात आली. संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

आठवडाभरात सहा जणांची हत्या : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबरपासून आठवडाभरात या सहा जणांची हत्या करण्यात आली. आरोपी प्रशांत यानं प्रथम त्याचा मित्र प्रसाद याची हत्या केली. हत्येनंतर त्यानं प्रसादचा मृतदेह डिचपल्ली येथे महामार्गाच्या कडेला पुरला. त्यानंतर प्रशांतनं प्रसादच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीचीही हत्या केली. हत्येनंतर त्यानं तिचा मृतदेह बसारा येथील गोदावरी नदीत फेकून दिला.

बहीण आणि मुलांचीही हत्या : प्रसाद आणि त्याच्या पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी प्रशांत प्रसादच्या बहिणीकडे गेला. प्रशांतनं तिला सांगितलं की, प्रसाद आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संभाषणादरम्यान त्यानं प्रसादच्या बहिणीचीही हत्या केली. यानंतर त्यानं प्रसादच्या दोन मुलांचीही हत्या केली आणि त्यांना पोचमपाद सोन ब्रिजजवळील कालव्यात फेकून दिलं.

चार आरोपींना अटक : दुसरीकडे, सदाशिवनगरमध्ये कामारेड्डी नावाच्या आरोपीनं आणखी एका बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह जाळून टाकला. स्थानिक लोकांनी जळालेला मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि तपास करून आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपींनी कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याचं सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी प्रशांतनं एकट्यानं तिघांची हत्या केली, तर अन्य तिघांची हत्या त्यानं मित्रांसह केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

हे वाचलंत का :

  1. एकाच कुटुंबातील पाच जणांची सामूहिक आत्महत्या, मृतामध्ये तीन मुलांचा समावेश
  2. दुसऱ्या धर्मातील तरुणाबरोबर बहिणीचं प्रेमप्रकरण, संतापलेल्या भावानं अल्पवयीन बहिणीची गोळ्या झाडून केली हत्या
  3. करणी सेनेच्या अध्यक्षाची घरात घुसून हत्या, पाहा थरारक Video

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.