रांची - येथे गुन्हेगारांनी महिला इन्स्पेक्टरला चिरडले आहे. रांचीच्या तुपुदाना पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या महिला निरीक्षक संध्या टोप्पो यांना वाहनाने चिरडले. त्या चेकिंग ऑपरेशन दरम्यान चेक पोस्टवर उभ्या होत्या. त्यांनी एका संशयित वाहनाला थांबण्याची सूचना केली. त्यानंतरही गुन्हेगार थांबले नाहीत आणि संध्या टोप्पो यांना चिरडून गुन्हेगार फरार झाले.
गुन्हेगारांच्या वाहनाने धडक दिल्याने इन्स्पेक्टर संध्या टोप्पो गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रिम्समध्ये दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. गुमला आणि खुंटी पोलीस गुन्हेगारांचा पाठलाग करत होते. ही माहिती मिळताच संध्या टोप्पो या गुन्हेगारांना पकडण्यासाठी तपासणी मोहीम राबवून उभ्या होत्या. दरम्यान, गुन्हेगारांनी हे दुःसाहस केले.