पणजी - रात्री उशिरा केलेल्या कारवाईत पणजी टाऊन पोलिसांनी ( Panaji Town Police ) विक्रांत उर्फ विकी दत्तात्रेय देशमुख याला अटक ( Criminal Vikrant Deshmukh arrested Panaji police) केली आहे. पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एक बंदुक जप्त करण्यात आली आहे. विक्कीचा राज्यात नोंदवलेल्या 30 हून अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. सध्या तो मुंबईतील पीएस नेरुळ येथे खून, मकोका या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना ( Criminal Vikrant Deshmukh ) हवा आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर P.I. यांच्या नेतृत्वाखाली पोलिसाच्या टीम त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
यात मयूर पणशीकर, नितीन गोयनकर, आदित्य मार्डोळकर, मनोज पेडणेकर, परेश बुगडे, रामा घाडी यांचा समावेश होता. आरोपी गोव्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो प्राणघातक शस्त्र घेऊन येण्याची शक्यता खबऱ्यांने पोलिसांना दिली होती. पोलिसांना पाहून आरोपी फरार होण्याच्या तयारीत असतांनाच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
पणजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल - त्याच्याकडून पाच जिवंत काडतुसे असलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल, मोबाईल फोन, टोयोटा फॉर्च्युनर कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याच्यावर आर्म अॅक्ट 1959 च्या कलम 3 आर/डब्ल्यू 25 अन्वये पणजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पणजी पोलिसांचे वरिष्ठ पी.आय. यांच्या नेतृत्वाखालील नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली.