नवी दिल्ली - उत्तर दिल्लीतील भाजी मार्केट मधील दोन मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन मुले अडकली होती. त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि रेस्कू टीम बचाव कार्य करत आहेत.
दोन मुलांचा मृत्यू -
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुपारी 11ः50 वाजता त्यांना माहिती मिळाली की, भाजी मार्केट परिसरात दोन मजली जुनी जीर्ण झालेली इमारत रस्त्यावर कोसळली आहे. ज्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची शक्यता होती. अग्निशमन दल आणि पोलीस टीम हे घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू आहे. यामध्ये रेस्कू टीमने दोन मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे.
दुकानदार जखमी -
इमारती शेजारी असलेली एका व्यक्तीचे पाण्याची दुकान होते. इमारत कोसळल्यामुळे या घटनेत दुकानाचे नुकसान झाले असून दुकानदारही जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. दरम्यान बचाव कार्य चालू आहे. इमारतीच्या मलब्याखाली अजून काही नागरिक असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - सचिन वाझे यांना मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात हलवले.. गरज पडल्यास ओपन हार्ट सर्जरी