ETV Bharat / bharat

मुलायम सिंह यादव यांचे साढू आणि काँग्रेसच्या 'पोस्टर गर्ल'ने केले भाजपात प्रवेश - डॉ. प्रियंका मौर्यने केले भाजपात प्रवेश

समाजवादी पक्षाचे ( SP ) मुलायम सिंह यादव ( Mulayam Singh Yadav ) यांचे साढू प्रमोद गुप्ता ( Pramod Gupta Joined BJP ) व काँग्रेसची 'पोस्टर गर्ल' डॉ. प्रियंका मौर्य ( Priyanka Maourya Joined BJP ) यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला आहे. इतर पक्षातील आणखी काही जण लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी दिली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jan 20, 2022, 6:32 PM IST

लखनऊ ( उत्तर प्रदेश ) - समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव ( Mulayam Singh Yadav ) यांचे साढू प्रमोद गुप्ता ( Pramod Gupta Joined BJP ) यांनी गुरुवारी (दि. २० जानेवारी) भारतीय जनता पक्षात प्रवेश केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बातचित करताना प्रमोद गुप्ता म्हणाले, मुलायम सिंह यादव यांचे वय झाले आहे. त्यांचे म्हणणे त्यांचे कुटुंबियही ऐकत नाहीत. आता अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांच्या विचाराला विरोध केल्यास त्यांना पक्षात महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसची ‘पोस्टर गर्ल’ही भाजपात दाखल - प्रमोद गुप्ता यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या 'लडकी हूं लड सकती हूं' अभियानची ‘पोस्टर गर्ल’ डॉ. प्रियंका मौर्यनेही औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्वाइन कमेटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी म्हणाले, मुलायम सिंह यादव यांचे साढूने भाजपात प्रवेश केला आहे. आणखी काही विकेट घेण्याची आमची तयारी आहे.

यांनीही केला भाजपात प्रवेश - या व्यतिरिक्त, माजी आईएएस अधिकारी किशन सिंह अटोरिया, गायिका वंदना मिश्रा, सपाचे मनोज उर्फ मंटू राघव आणि अजित सिंह चौहान, सपाचे शेषपाल तोमर तसेच बसपाचे सुनीत शुक्ला यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.