ETV Bharat / bharat

Funeral of Mulayam Singh: मुलायमसिंग यादव पंचत्वात विलीन, अखिलेश यांनी दिला अग्नी - मुलायमसिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अखिलेश यादव यांनी वडील मुलायमसिंह यादव यांच्यावर अग्नी दिला.

मुलायमसिंग यादव पंचतत्वात विलीन
मुलायमसिंग यादव पंचतत्वात विलीन
author img

By

Published : Oct 11, 2022, 5:32 PM IST

Updated : Oct 11, 2022, 7:00 PM IST

लखनऊ (उत्तर प्रदेश) - नेताजी मुलायमसिंह यादव पंचत्वात विलीन झाले. मुलायमसिंह यादव यांच्यावर शासकीय इतमामात आज मंगळवार (दि. 11 ऑक्टोबर)रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. अखिलेश यादव यांनी वडिलांना आग्निडाग दिला. (Funeral of Mulayam Singh Yadav) यावेळी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व पक्षांचे नेते, उद्योगपती, अभिनेते यांच्यासह लाखो लोक सैफईवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलायमसिंग यादव पंचतत्वात विलीन

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे - मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर सैफई या वडिलोपार्जित निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना अग्नी दिला. माजी केंद्रीय मंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात निधन झाले. त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांना महिनाभरापूर्वी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अंत्यविधीसाठी काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी आणि इतर पक्षाचे नेते मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.

मुलायमसिंग यादव पंचतत्वात विलीन
मुलायमसिंग यादव पंचतत्वात विलीन

नेताजींच्या मृत्यूची बातमी कळताच चाहत्याने आत्महत्या केली - कानपूरमध्ये नेताजी मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. हा चाहता एक कामगार होता. या कामगाराच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. राजेश कुमार यादव (50) हे इस्पात नगरमध्ये मजूर म्हणून काम करायचे, असे सांगितले जात आहे. सोमवारी कामावरून घरी परतत असताना त्यांना मुलायमसिंह यादव यांच्या निधनाची माहिती मिळाली. त्यावर ते संतापले आणि म्हणाले की, मुलायम सिंह राहिले नाहीत तर जगून काय करणार. त्याने पांडू नदीत उडी मारली आणि आपले जीवन संपवले. राजेश यादव यांच्या निधनानंतर पत्नी रामरती आणि चार अल्पवयीन मुली ममता, ललिता, सरिता आणि आरुषी यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Last Updated : Oct 11, 2022, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.