ETV Bharat / bharat

केंद्रीय सुरक्षा मागे घेण्याबाबत मुकुल रॉय यांचे गृह मंत्रालयाला पत्र

पश्चिम बंगाल राज्यात राजकीय घडामोडींनी वातावरण गरम आहे. शुक्रवारी भाजपा नेते मुकुल रॉय यांनी आपला मुलगा शुभ्रांशु रॉय यांच्यासह पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलमध्ये घरवापसी झाल्यार आज टीएमसी नेते मुकुल रॉय यांना पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून झेड प्रवर्गाची सुरक्षा मिळाली आहे.

केंद्रीय सुरक्षा मागे घेण्याबाबत मुकुल रॉय यांचे गृह मंत्रालयाला पत्र
केंद्रीय सुरक्षा मागे घेण्याबाबत मुकुल रॉय यांचे गृह मंत्रालयाला पत्र
author img

By

Published : Jun 12, 2021, 5:39 PM IST

कोलकाता - काही दिवसापूर्वी पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली. राज्यात राजकीय घडामोडींनी वातावरण गरम आहे. शुक्रवारी भाजपा नेते मुकुल रॉय यांनी आपला मुलगा शुभ्रांशु रॉय यांच्यासह पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलमध्ये घरवापसी झाल्यार आज टीएमसी नेते मुकुल रॉय यांना पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून झेड प्रवर्गाची सुरक्षा मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून सुरक्षा मिळाल्यानंतर मुकुल रॉय यांनी केंद्रीय सुरक्षा मागे घेण्याबाबत गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. केंद्राने या विनंतीला प्रतिसाद दिला आहे की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. मुकुल रॉय यांच्यासह त्यांच्या मुलालाही राज्य सरकारकडून वाय श्रेणी सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे.

मुकुल रॉय यांनी सर्वात आधी टीएमसीला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2017 मध्ये तृणमूलला रामराम ठोकला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विस्तार करण्यात मुकुल रॉय यांनी मोठी कामगिरी पार पाडली. मात्र, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपुर्वी टीएमसीचे सुवेंदू अधिकारी यांना भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाचे वर्तुळ सुवेंदूभोवती फिरू लागल्याने मुकुल रॉय दुर्लक्षीत झाले. अखेर मुकुल रॉय यांनी निर्णय घेत, भाजपाला रामराम ठोकला.

कोण आहेत मुकुल रॉय?

मुकुल रॉय तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांनी टीएमसी स्थापित करण्यासाठी मेहनत घेतली होती. युपीए सरकारच्या काळात त्यांनी केंद्रात मंत्रिपद सांभाळली. मात्र, 2015 मध्ये शारदा आणि नारदा घोटाळ्यात अडकल्यानंतर तृणमूलने त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर ते टीएमसीवर नाराज असल्याच्यी माहिती आहे. अखेर 2017 मध्ये त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत भाजपाची वाट धरली होती. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी कृष्णानगर दक्षिणमध्ये विजय मिळवला आहे. मात्र, भाजपावर नाराज झाल्याने आता पुन्हा त्यांनी घरवापसी केली.

हेही वाचा - ‘घर का लडका घर वापस आया’; मुकुल रॉय यांच्या टीएमसी प्रवेशावर ममतांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.