नवी दिल्ली - 'गरिबांचा श्रीमंत देश' अशी कधीकाळ ओळख असलेल्या भारताने आज मैलाचा दगड गाठला आहे. देशात 1 हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या 1 हजारांहून अधिक झाली आहे. तर सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी हे भारतामधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्त ठरले आहेत. ही माहिती हरुण इंडियाने 'आयआयएफएल वेल्थ हरुण इंडिया रिच लिस्ट 2021' मध्ये प्रसिद्ध केली आहे.
देशात 1 हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या 1007 आहे. हे श्रीमंत देशामधील विविध 119 शहरांमधील आहे. देशातील श्रीमंतांची एकूण संपत्ती 51 टक्क्यांनी वाढली आहे. तर सरासरी 25 टक्क्यांनी संपत्ती वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-ठरलं! काँग्रेसला अमरिंदर सिंग दाखविणार 'हात'; कमळाचा करणार नाही स्वीकार
हरुण इंडियाच्या यादीमधील हे आहेत महत्त्वाचे मुद्दे-
- श्रीमंतांच्या यादीमधील 894 जणांची संपत्ती जैसे थे राहिले आहे. तर 229 जणांचा यादीत नव्याने समावेश झाला आहे.
- 113 जणांची संपत्ती कमी झाली आहे. तर 51 जण हे श्रीमंतांच्या यादीतून बाहेर गेले आहेत.
- देशामध्ये 237 अब्जाधीश आहेत. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत 58पेक्षा जास्त आहे.
- केमिकल आणि सॉफ्टवेअरमधील श्रीमंतांच्या यादीत वाढ झाली आहे.
- औषधी कंपन्यांमधील श्रीमंत हे यादीत आघाडीवर आहेत. नवीन श्रीमंतांमध्ये 130 जण हे औषधांचे उत्पादक आहे. या यादीमध्ये सर्वाधिक तरुण हा 23 वर्षांचा आहे.
हेही वाचा-शेतकऱ्यांना हेक्टरी 30 हजार रुपयांची मदत द्या, अन्यथा.. नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
मुकेश अंबानी सलग दहाव्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत
- सलग दहाव्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअमरन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे भारतामधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 7 लाख 18 हजार कोटी आहे.
- गौतम अदानी आणि कुटुंबाची एकूण 5,05,900 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत अदानी ग्रुपचे एकूण भांडवली मूल्य हे 9 लाख कोटी रुपये आहे. तर अदानी पॉवर वगळता ग्रुपमधील सर्व कंपन्यांचे भांडवली मूल्य हे 1 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. हरुण इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, की गौतम अदानी हे देशातील एकमेव भारतीय आहेत, ज्यांनी 1 लाख कोटींची संपत्ती असलेल्या पाच कंपन्या आहेत.
- एचसीएलचे शिव नाडर हे हरुण इंडियाच्या श्रीमंताच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कोरोनाच्या काळात त्यांच्या प्रवास, रिटेल आणि हॉस्पिटिलिटी उद्योगावर परिणाम झाला. तरीही त्यांच्या संपत्तीत 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नाडर यांची एकूण 2 लाख 36 हजार 600 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
हेही वाचा-खुशखबर! रामोजी फिल्म सिटी 8 ऑक्टोबरपासून पुन्हा होणार खुली; पाहायला मिळणार 'ही' मनोरंजनाची ठिकाणे