ETV Bharat / bharat

Auction For 5G Spectrum Commences : 5G स्पेक्ट्रमसाठी बहुप्रतिक्षित लिलाव झाला सुरू

author img

By

Published : Jul 26, 2022, 11:40 AM IST

Updated : Jul 26, 2022, 12:28 PM IST

5G टेलिकॉम स्पेक्ट्रमसाठी बहुप्रतिक्षित लिलाव मंगळवारी सुरू झाला. लिलावात रिलायन्स जिओ ( Reliance Jio ), अदानी समूह ( Adani Group ) , भारती एअरटेल ( Bharti Airtel ) आणि व्होडाफोन आयडिया ( Vodafone Idea ) हे चार प्रमुख सहभागी आहेत.

5G spectrum
5G spectrum

नवी दिल्ली - बहुप्रतिक्षित असलेला 5G टेलिकॉम स्पेक्ट्रमसाठी लिलाव मंगळवारी सुरू झाला. लिलावात रिलायन्स जिओ ( Reliance Jio ), अदानी समूह ( Adani Group ) , भारती एअरटेल ( Bharti Airtel ) आणि व्होडाफोन आयडिया ( Vodafone Idea ) हे चार प्रमुख सहभागी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच दूरसंचार विभागाच्या (DoT) 5G स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी दिली आहे. ज्याद्वारे जनतेला तसेच उद्योगांना 5G सेवा प्रदान करण्यासाठी लिलावात बोली लावणाऱ्यांना स्पेक्ट्रम दिले जातील.

भारताला मार्च 2023 पर्यंत पूर्ण 5G सेवा मिळण्याची अपेक्षा आहे, असे केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात सांगितले. वैष्णव म्हणाले की 5G स्पेक्ट्रमचा लिलाव जुलैच्या अखेरीस पूर्ण होईल, ते पुढे म्हणाले, "टेलिकॉम हे डिजिटल वापराचे प्राथमिक स्त्रोत आहे आणि टेलिकॉममध्ये विश्वासार्ह समाधान आणणे खूप महत्वाचे आहे. भारताकडे रेडिओ, उपकरणे आणि हँडसेट यांसारखी 4G ची स्वतःची सक्षम यंत्रणा आहे. 5G प्रायोगिक तत्त्वावर तयार आहे आणि 5G सेवा मार्च 2023 मध्ये सुरू होईल.

हेही वाचा - Uddhav Thackeray Interview: घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला- उद्धव ठाकरे

Last Updated : Jul 26, 2022, 12:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.