ETV Bharat / bharat

खासदार प्रज्ञा सिंह यांची प्रकृती गंभीर; एअर अॅम्युबलन्सने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी व भोपाळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रज्ञा सिंह यांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांच्यावर काही दिवस दिल्लीमधील एम्समध्ये उपचार करण्यात आले होते

खासदार प्रज्ञा सिंह
खासदार प्रज्ञा सिंह
author img

By

Published : Mar 6, 2021, 3:53 PM IST

Updated : Mar 6, 2021, 4:59 PM IST

भोपाळ- खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची अचानक प्रकृती बिघडली आहे. त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात आले आहे. त्यांना श्वास घेताना त्रास होत आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी व भोपाळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रज्ञा सिंह यांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांच्यावर काही दिवस दिल्लीमधील एम्समध्ये उपचार करण्यात आले होते. उपचार करून परतल्यानंतर त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.

एअर अॅम्युबलन्सने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात आले आहे. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्समधून उपचार घेतल्यानंतर त्यांनी सातत्याने विविध बैठकांमध्ये सहभाग घेतला होता.

खासदार प्रज्ञा सिंह यांची प्रकृती गंभीर

सातत्याने बैठकांमध्ये घेतला आहे सहभाग-

आजही त्यांनी शिक्षा समितीच्या बैठकीत सहभागी होणार होत्या. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्या बैठकीला हजर राहू शकल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा त्यांना तातडीने भोपाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा-हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने निर्माण झाले अनेक नवे प्रश्न, अंबानींना धमकी प्रकरणाला कलाटणी

कोण आहेत प्रज्ञा सिंह?

29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ पार्क केलेल्या मोटारसायकलमध्ये लावलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन सहा जण ठार तर, 100 हून अधिक लोक जखमी झाले. या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा प्रज्ञा सिंह यांच्यावर आरोप आहे. एनआयएने म्हटले आहे की, आरोप निश्चित झाल्यानंतर या प्रकरणातील खटला त्वरेने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. विरोधकांच्या काळ्या जादूमुळेच भाजप नेत्यांचे मृत्यू, नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हणणे अशा वादग्रस्त विधानांमुळे त्यांनी अनेकदा पक्षाला अडचणीत आणले होते. दिवसातून 5 वेळा जर हनुमान चालिसा मंत्रपठण केला तर जग कोरोना महामारीतून मुक्त होईल, असे त्यांनी जुलै २०२० मध्ये विधान केले होते.

हेही वाचा-'मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधीपक्षाने प्रश्न उपस्थित केले असतील, तर त्याचा तपास व्हायला हवा'

Last Updated : Mar 6, 2021, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.