मध्य प्रदेश : मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी मंगळवारी यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले ( Nana Patole ) यांच्यावर कडाडून टीका केली आहे. गुरांमध्ये पसरणारा विषाणू रोगाचा संबंध नामिबियातून आणलेल्या चित्ताशी जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पटोलेंना डोक्याच्या मालिशची गरज आहे ( Lumpy virus ) असा त्यांनी टोला लगावला.
नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना पटोले : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना पटोले म्हणाले होते की, नायजेरियातून चित्ते आणण्यात आली होती, जिथून त्वचारोग पसरत आहे. पुढे मिश्रा म्हणाले, नाना पटोले ( Nana Patole ) यांना डोक्याच्या मसाजाची गरज हवी आहे.
नाना पटोले यांचे नामिबियन चित्त्यांबाबत वक्तव्य : महाराष्ट्रातील भंडारा येथे पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी आरोप केला होता की, देशात परदेशी रोग नायजेरियन चित्त्यांनी आणले होते, याआधी गायी-बैल अशा रोगाने मरत नव्हते. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे.
-
Cheetahs were brought to India from Namibia, and not Nigeria @NANA_PATOLE Ji 🙏 https://t.co/Jvv66s0MBG
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) October 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Cheetahs were brought to India from Namibia, and not Nigeria @NANA_PATOLE Ji 🙏 https://t.co/Jvv66s0MBG
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) October 3, 2022Cheetahs were brought to India from Namibia, and not Nigeria @NANA_PATOLE Ji 🙏 https://t.co/Jvv66s0MBG
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) October 3, 2022
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच ट्विट : या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट केले की, "चित्ते नायजेरियातून नव्हे तर नामिबियातून भारतात आणले गेले आहेत. यासोबतच सिंधिया यांनी या ट्विटमध्ये पटोले यांना टॅग केले. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी चित्ता पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ( Kuno National Park ) आठ नामिबियन चित्ता सोडले.