झाबुआ (मध्यप्रदेश) - मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह कार्यक्रमात पुन्हा वाद निर्माण झाला आहे. हे विवाह सोहळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. दिंडोरीनंतर आता झाबुआमध्ये वाद निर्माण झाला आहे. झाबुआ जिल्ह्यातील थंडला येथे आयोजित मुख्यमंत्री कन्या सामुदाईक विवाह सोहळा कार्यक्रमात मेक-अप किटमध्ये कुटुंब नियोजनाचे साहित्य आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे साहित्य बघून कुटुंबीयांनी गोंधळ घातला तेव्हा अधिकाऱ्यांचीही नियोजनातील चालढकल चव्हाट्यावर आली. हा कुटुंब नियोजनाचाच एक भाग असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणावरून काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे.
मेक अप किटमध्ये कुटुंबनियोजन साहित्य, नातेवाईक संतापले : विशेष म्हणजे सध्या जिल्ह्यात जिल्हा आणि पंचायत स्तरावर मुख्यमंत्री कन्या विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत. सोमवारी थंडला जिल्हा पंचायतीत हा कार्यक्रम झाला. येथे 292 जोडप्यांचे लग्न पार पडले. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात वधूला देण्यात आलेला मेक-अप किट उघडला असता त्यामध्ये माला एन आणि इझी पिल या कुटुंब नियोजनाच्या गोळ्या आणि इतर साहित्य ठेवण्यात आले होते. जे पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. अशावेळी असे साहित्य देणे योग्य नसल्याचे सांगत नातेवाइकांनी त्याला विरोध केला.
-
शिव'राज में बेशर्मी चरम पर :
— MP Congress (@INCMP) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मध्यप्रदेश की बीजेपी सरकार ने कन्याविवाह योजना के अंतर्गत दिए गए मेकअप बॉक्स में कंडोम ओर गर्भनिरोधक टेबलेट्स बांटे है।
शिवराज जी,
कोई शर्म बाकी है❓ pic.twitter.com/2kvT6JBO7E
">शिव'राज में बेशर्मी चरम पर :
— MP Congress (@INCMP) May 30, 2023
मध्यप्रदेश की बीजेपी सरकार ने कन्याविवाह योजना के अंतर्गत दिए गए मेकअप बॉक्स में कंडोम ओर गर्भनिरोधक टेबलेट्स बांटे है।
शिवराज जी,
कोई शर्म बाकी है❓ pic.twitter.com/2kvT6JBO7Eशिव'राज में बेशर्मी चरम पर :
— MP Congress (@INCMP) May 30, 2023
मध्यप्रदेश की बीजेपी सरकार ने कन्याविवाह योजना के अंतर्गत दिए गए मेकअप बॉक्स में कंडोम ओर गर्भनिरोधक टेबलेट्स बांटे है।
शिवराज जी,
कोई शर्म बाकी है❓ pic.twitter.com/2kvT6JBO7E
आरोग्य विभागाचे काम : कुटुंब नियोजनासंबंधीचे साहित्य आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात जिल्हा सीईओ भुरसिंह रावत सांगतात की, लग्न पार पाडण्याची जबाबदारी आमची होती. दुसरीकडे, सीएमएचओच्या डॉ. जेपीएस ठाकूर म्हणतात की मेक-अप किटमध्ये दिलेले घटक कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा भाग आहेत. विवाहित जोडप्यांना याबाबत जागरूक करणे ही आपली जबाबदारी आहे. यात काही गैर नाही. गेल्या महिन्यात दिंडोरी जिल्ह्यात आयोजित मुख्यमंत्री कन्या विवाह सोहळ्यात मोठा गोंधळ झाला होता. तेथे लग्नासाठी आलेल्या मुलींची गर्भधारणा चाचणी करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. आता हे प्रकरण नव्याने समोर आल्याने पालक आणि जोडपीही विविध प्रतिक्रिया देत आहेत.