दतिया (मध्य प्रदेश) MP Firing : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. येथे किरकोळ वादातून दोन घटामध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत.
गाई चारण्यावरून दोन गटात वाद झाला : दतिया येथं गाई चारण्यावरून दोन गटात वाद झाला. त्यानंतर प्रकाश डांगी आणि प्रीतम पाल या दोघांमध्ये शेतावरच अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारात गोळी लागल्यानं प्रकाश डांगी, रामनरेश डांगी, सुरेंद्र डांगी, राजेंद्र पाल आणि राघवेंद्र पाल या पाच जणांचा मृत्यू झाला. गोळीबारात अन्य १२ जण जखमी झाले आहेत. तीन दिवसांपूर्वीही या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गावात तणावाचं वातावरण : दतियाच्या रेंडा गावात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन तडक घटनास्थळी पोहोचलं. सध्या तिथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरे शेतात घुसल्यावरून दोन गटांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये एका बाजूचे दोन तर दुसऱ्या बाजूचे तीन जण मरण पावले. ही गोळीबाराची घटना डांगी आणि पाल समाजांमध्ये घडली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. सध्या गावात तणावाचं वातावरण आहे.
गावातील पंचायतीत वाद झाला : या गावातील बहुतांश लोक डांगी आणि पाल समाजाचे आहेत. शेतात गुरे आणण्यावरून या दोन गटात वाद झाला. यावर तोडगा काढण्यासाठी गावात दोन्ही गटाची पंचायत बोलावण्यात आली होती. मात्र मध्यस्थांनी समजूत घालूनही वाद वाढत गेला. त्यानंतर वादानं हिंसक वळण घेतलं आणि ताबडतोब लाठ्या-काठ्या तसंच गोळ्या बरसणं सुरू झालं. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा :