दतिया (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एका ६ वर्षाच्या गरीब मुलाची पोलीस हेड कॉन्स्टेबलने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या मागणीवरून झालेल्या वादातून ही हत्या झाली. हत्या केल्यावर हवालदाराने मृतदेह आपल्या कारमध्ये नेऊन ग्वाल्हेर शहराजवळील निर्जन ठिकाणी फेकून दिला.
दतिया येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पोलिस अधीक्षक अमन सिंह राठोड यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात गुरुवारी ही घटना घडली. आणि ग्वाल्हेरमधील पोलिस ट्रेनिंग स्कूलमध्ये हेड कॉन्स्टेबल रवी शर्मा यांना अटक करण्यात आली.
आरोपीने दिली कबुली
आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले की, तो काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. मुलगा त्याच्याकडे पैशाची मागणी करायचा तेव्हा तो चिडायचा. यामुळे त्याने खुनासारखे धोकादायक पाऊल उचलले. दतिया येथील रहिवासी संजीव सेन यांनी ५ मे रोजी त्यांचा मुलगा मयंक (६ वर्षे) याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी माहिती गोळा करण्यासाठी तपास सुरू केला. तेव्हा झाशी रोड पोलिस स्टेशन हद्दीतील ग्वाल्हेरच्या विवेकानंद चौराहा भागात एका मुलाचा मृतदेह आढळून आला.
सीसीटीव्ही फूटेज केले चेक
मुलगा ज्या भागातून बेपत्ता झाला. तेथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी शर्मा यांना याबद्दल माहिती होती. चौकशीदरम्यान शर्माने पोलिसांना सांगितले की, त्याला फील्ड ड्युटी देण्यात आली होती. तो दतियाच्या पंचशील नगरमध्ये ड्युटीवर असताना हा मुलगा त्याच्याकडे वारंवार येऊन पैसे मागत होता.