भोपाळ : भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती परिषदेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर गुन्हेही दाखल करण्यात आले. या दरम्यान भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र कैसरगंज येथील रविवारच्या सभेत ब्रिजभूषण सिंह यांनी खास शायराना अंदाजात आपल्यावरील आरोपाचे खंडन केले. यावेळी ब्रिजभूषण सिंह यांनी मोठे शक्तीप्रदर्शनही केले. ब्रिजभूषण सिंह यांनी कभी अश्क . . .कभी गम . . . और कभी जहर पिया जाता है, अशी शायरी सादर करत आपल्यावर लावलेल्या आरोपाचे खंडन केले.
खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केले शक्तीप्रदर्शन : कैसरगंज येथे रविवारी भाजप सरकारच्या 9 वर्षांच्या अतुलनीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती नागरिकांना देण्यात आली. बालपूर बाजारजवळील एका खासगी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी आपल्या काव्यात्मक शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. मोहन यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते होते. सरकारच्या कामगिरीची माहिती देण्याच्या बहाण्याने ब्रिजभूषण सिंह यांनीही शक्तिप्रदर्शन केले. रोड शो करत खासदार ब्रिजभूषण सिंह हे घटनास्थळी पोहोचले.
'कभी अश्क-कभी गम और कभी जहर पिया जाता है, तब यह मिला मुझको मोहब्बत का सिला, बेवफा कहके मेरा नाम लिया जाता है, इसको रुसवाई कहें या शोहरत, अपने दबे होठों से मेरा नाम लिया जाता है, कभी-कभी अपने आप से सवाल करने लगते हैं, जब-जब सरसरी नजर से सवाल करते हैं, तो गंभीर चीजों को नकार देते हैं' - ब्रिजभूषण सिंह यांनी सादर केलेली शायरी
कैसरगंज मतदार संघातून लढवणार निवडणूक : काँग्रेसच्या काळात भारताची 78 हजार चौरस मीटर जमिनीवर ताबा करण्यात आला. यात चीनने 33 हजार चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली. 92 हजार चिनी सैनिकांना भारताने कैद केले तेव्हा मोदींचे सरकार असते तर देशाचे अनेक प्रश्न सुटले असते. 2014 आणि 2019 मध्ये भाजपने पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे. 2024 मध्येही भाजप पुन्हा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे ब्रिजभूषण सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले. मोदी सरकारने खूप काम केले आहे. मंदिरे बांधली गेली, रस्तेही बांधले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मी कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
काँग्रेसने खुंटवला देशाचा विकास : मंत्री डॉ. मोहन यादव यांनी यावेली मोदी सरकारचे कौतुक केले. 9 वर्षांच्या कामगिरी अधोरेखित केली. काँग्रेसवर निशाणा साधत त्यांनी आधीच्या सरकारांने देशाचा विकास खुंटवला असल्याचे सांगितले. अटलजींनी देशाला रस्त्यांनी जोडले, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरजूंना घरे दिली. आता सरकारकडून येणारा पैसा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जातो. आता मध्यस्थांचे काम संपले आहे. जेव्हा सरकारने भव्य राम मंदिर बांधले तेव्हा तेथे विकासाचे नवे आयाम जोडले गेले. संरक्षणाच्या बाबतीत देश मजबूत झाला आहे. शिक्षण क्षेत्रातही अनेक यश संपादन केल्याचेही मोहन यादव यांनी यावेळी सांगितले. अकबर, बाबर कधीच महान होऊ शकत नाहीत, आपल्या देशाचे शूर सुपुत्र महान आहेत, असाही हल्लाबोल मोहन यादव यांनी यावेळी केला.
हेही वाचा -