नवी दिल्ली - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विरोधकांच्या बैठकीवरून जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी नीतीश कुमार, उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टार्गेट केले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा सेक्युलर पक्ष असल्याचे सांगितले जाते. मात्र, हो आम्हीच बाबरी पाडली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी छाती ठोकून विधीमंडळात सांगितले होते, असे ओवैसी यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सेक्युलर पार्टी आहे. उद्धव ठाकरे हे मु्ख्यमंत्री असताना बाबरी आम्हीच पाडली आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे छाती ठोकून विधीमंडळात सांगितले होते - असदुद्दीन ओवैसी, अध्यक्ष- एमआयएम
-
#WATCH | AIMIM President & MP, Asaduddin Owaisi attacks Opposition meeting, says, "What is the track record of all these political leaders who have assembled there?" pic.twitter.com/CrucBpjz3D
— ANI (@ANI) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | AIMIM President & MP, Asaduddin Owaisi attacks Opposition meeting, says, "What is the track record of all these political leaders who have assembled there?" pic.twitter.com/CrucBpjz3D
— ANI (@ANI) June 23, 2023#WATCH | AIMIM President & MP, Asaduddin Owaisi attacks Opposition meeting, says, "What is the track record of all these political leaders who have assembled there?" pic.twitter.com/CrucBpjz3D
— ANI (@ANI) June 23, 2023
उद्धव ठाकरे, शरद पवार हजर - देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी पाटण्यात आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये देशातील विरोधी पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची तयारी करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सुरुवात होणा गरजेचे होते आणि ती सुरुवात आजपासून झाली असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आमची विचारधारा वेगळी आहे, पण देश एक आहे. देशाची एकता कायम ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाहीवर आघात करणाऱ्यांचा आम्ही विरोध करणार आहोत. देशात हुकूमशाही आणू इच्छिणाऱ्यांना आम्ही विरोध करू - उद्धव ठाकरे
निवडणुका एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब - भाजपाविरोधी एकत्र येण्याकरता देशभरातील सर्व विरोधी पक्ष आज बिहारच्या पाटण्यात जमले होते. पाटण्यात सर्वपक्षीय विरोधकांची बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून निवडणुका एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व नेत्यांनी आपली मते मांडली.
हेही वाचा -