झारखंड ( रांची ) : पलामू जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. या घटनेत एका आईने आपल्याच मुलाचा खून केला आणि स्वत: गळफास घेतला. सुदैवाने, या घटनेत 10 वर्षांचा मुलगा वाचला आहे. या घटनेत तो रात्रभर लहान भावाच्या आणि आईच्या मृतदेहाजवळ झोपला. ही घटना पलामू विभागाचे मुख्यालय असलेल्या मेदिनीनगरपासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनाटू पोलीस स्टेशन हद्दीतील रंगेया गावाजवळ घडली. हा परिसर बिहारमधील गयाच्या इमामगंजला लागून आहे.
झोका खेळू म्हणत हत्या : शांती देवी पतिसोबतच्या रोजच्या भांडणांना कंटाळली होती. नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचा तिला खूप राग आला होता. ही घटना ती विसरू शकत नव्हती. तिला सतत राग येत होता. त्यामुळे शनिवारी रात्री दोन्ही मुलांना खाऊ घातल्यानंतर त्या शांती देवी यांनी साडीची दोरी तयार केली. आपल्या दोन्ही मुलांना झोका खोळूयात म्हणाली. त्यानंतर शांती देवी यांनी आपल्या दोन्ही मुलांना मारण्याचा प्रयत्न केला. यात 8 वर्षाच्या मुलाला जीव मगवावा लागला. एक मुलगा कसाबसा वाचला.
सामूहिक आत्महत्या प्रकरण : ही संपूर्ण घटना पलामूच्या मनाटू पोलीस स्टेशन परिसरातील आहे. आई-मुलाच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी शांती देवी आणि त्यांच्या मुलाचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी एमएमसीएचमध्ये पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार, रंगेया येथील रहिवासी असलेल्या शांती देवी नावाच्या महिलेला 10 वर्षांचा मुलगा छोटू आणि 8 वर्षांचा मुलगा कुणाल होता. मोठा मुलगा छोटू कुमार स्वत:ला वाचवण्यात यशस्वी झाला. स्वत:ला वाचवल्यानंतर तो आई आणि लहान भावासाठी काही करू शकला नाही. तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.
नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नामुळे शांती त्रस्त : वर्षभरापूर्वी शांती देवीचे पती विकास दास याने दुसरे लग्न केले. तो मजुरीचे काम करतो. त्यामुळे शांती देवी खूप अस्वस्थ, दुःखी होत्या. अलीकडेच विकासची दुसरी बायको शांतीची सवत काही दिवस रंगेयातील त्याच घरात राहिली होती. याचा शांतीला खूप राग आला होता. यावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणे होत होती. विकास शांतीला मारहाण करत होता. पलामूमधील आत्महत्येबाबत मनाटू पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार म्हणाले की, ही आत्महत्या कौटुंबिक वादातून झाली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणातील सर्व मुद्द्यांवर तपास करत आहेत.