सोलापूर- आई आणि मुलांच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना कलबुर्गी येथे घडली आहे. कौटुंबिक वादातून एका आईने आपल्या दोन पोटच्या पोरांना पेटवले. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्नाटकातील कलबुर्गी येथील स्टेशन बाजार परिसारत ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यात आईसह दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. दीक्षा असे आईचे नाव आहे. सिंचा आणि धनंजय अशी मयत मुलांची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलबुर्गी येथील स्टेशन बाजार परिसरात राहणाऱ्या दीक्षा हिचे कौटुंबीक वाद होते. हे वाद इतके टोकाला गेले होते, की तिचे कुटुंबीयांसोबत वारंवार खटके उडायचे. असेच भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात तिने मुलगी सिंचा (2), मुलगा धनंजय(3) यांच्यावर रॉकेल ओतले. दोघांना पेटवून दिले. या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.