बंगळूरू: पाच वर्षांपूर्वी राजधानीतील वृद्ध महिला शांताकुमारीच्या हत्येचा (old woman killed) केंगेरी पोलिसांनी अखेर उकल केला आहे. या प्रकरणातील आरोपी आई व मुलाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. (Mother and son arrested from Kolhapur). गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली होती, मात्र या प्रकरणातील तिसरा आरोपी वगळता मुख्य आरोपी शोधण्यात त्यांना अपयश आले. केंगेरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी शशिकला (४६) आणि त्यांचा मुलगा संजय (२६) यांना कोल्हापुर, महाराष्ट्र येथे अटक केली.
पाच वर्षांपूर्वी वृद्ध महिलेची हत्या: केंगेरी सॅटेलाइट कॉलनीतील घरात हत्या करण्यात आलेल्या ६९ वर्षीय शांताकुमारी ह्या आरोपी मुलगी शशिकला आणि नातू संजय यांच्यासह त्याच घरात राहत होत्या. शशिकला या गृहिणी असून त्यांच्या पतीचे बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुलगा संजय हा खासगी महाविद्यालयात एरोनॉटिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या सत्राचा विद्यार्थी आहे. ऑगस्ट 2016 मध्ये संजयने शुल्लक कारणावरून रागाच्या भरात लाठीने शांताकुमारीच्या डोक्यावर प्रहार केला. यानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने शांताकुमारीचा घरातच मृत्यू झाला.
आईच्या व मित्राच्या मदतीने लावली मृतदेहाची विल्हेवाट: हत्येनंतर मृतदेह घरातून काढणे अशक्य झाल्याने संजयने कुंबलागोडी येथील आपला मित्र नंदिश याला मदतीसाठी बोलवले. तिघांनी मिळून मृतदेह घरातील कपाटात लपवला. वास टाळण्यासाठी रसायने जोडली. नंतर त्यांनी घराच्या आत भिंत खोदली, त्यात मृतदेहाला पुरले, नंतर सिमेंटने प्लास्टर करून ते रंगवले. त्यानंतर ते या भाड्याच्या घरातून फरार झाले. काही महिन्यांनंतर 7 मे 2017 रोजी जेव्हा मालक घराच्या दुरुस्तीसाठी गेला त्यावेळी त्याला भिंतीजवळ रक्ताने माखलेली साडी पडलेली दिसली तसेच घरात राहणारी वृद्ध महिलाही दिसली नाही. तेव्हा संशय येवून त्यांनी तत्काळ तत्कालीन निरीक्षक गिरीराज यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
कोल्हापूरातून अटक: वृद्ध महिलेच्या हत्येनंतर आई आणि मुलगा अटकेच्या भीतीने शिमोगा येथील सागर येथे त्यांच्या मूळ गावी गेले होते. नंतर ते महाराष्ट्रातील कोल्हापुरात लपले. संजय एका स्थानिक हॉटेलमध्ये पुरवठादार म्हणून काम करत होता आणि त्याची आई क्लिनर म्हणून काम करत होती. आता पोलिसांनी त्यांना अटक करून बेंगळुरूला आणले.