ETV Bharat / bharat

लाल किल्ल्यावर तलवार नाचवणारा मोस्ट वॉन्टेड मनिंदर सिंग अटकेत

लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड आरोपी मनिंदर सिंग याला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीतील स्वरूप नगर भागातील त्याच्या घरातून त्याला अटक केली आहे.

मनिंदर सिंग अटकेत
मनिंदर सिंग अटकेत
author img

By

Published : Feb 17, 2021, 10:54 AM IST

Updated : Feb 17, 2021, 1:47 PM IST

नवी दिल्ली - लाल किल्ल्यावरील हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड आरोपी मनिंदर सिंगला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पितमपुरामधील स्वरूप नगर भागातील त्याच्या घरातून अटक केली. घरातून दोन तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. मनिंदर सिंगने लाल किल्ल्यावर तलवार नेली होती. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

संशयित आरोपींवर गुन्हे दाखल -

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी रॅली काढली होती. या रॅलीला हिंसक वळण लागले होते. या हिंसेला जबाबदार असलेल्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली असून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पंजाबी अभिनेता दिप सिदू, सुखदेव सिंग, इक्बाल सिंग यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. आता मनिंदर सिंग यालाही अटक करण्यात आली आहे.

ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण -

रॅलीच्या दिवशी आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून मोर्चाचा मार्ग बदलला होता. तसेच पोलिसांशी झटापट केली होती. यात अनेक पोलील जखमी झाले होत. आंदोलकही जखमी झाले होते. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. तर सार्वजनिक मालमत्तेचीही नुकसान झाले होते. ट्रॅक्टर रॅली हिंसाचाराप्रकरणी इक्लाब सिंगला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात त्याला आणण्यात येणार आहे. पंजाबमधील होशियारपूरमधून पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला ९ फेब्रुवारीला अटक केली होती.

Last Updated : Feb 17, 2021, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.