हैदराबाद : रंगारेड्डी जिल्ह्यातील आदिभटला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन्नेगुडा येथे कुटुंबीयांवर हल्ला करून मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. (Girl kidnapped in Telangana). गावातील दामोदर रेड्डी आणि निर्मला दाम्पत्याचा आरोप आहे की नवीन रेड्डी आणि 100 हून अधिक तरुण एक कार आणि डीसीएममध्ये आले आणि त्यांच्या मुलीला घेऊन गेले. (More than 100 men kidnapped girl). तसेच त्यांनी घरातील उपकरणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि कारची देखील नासधूस केल्याचे त्यांनी सांगितले.
-
Ranga Reddy, Telangana | A woman has been kidnapped from her house at Adibatla. The woman’s parents alleged that around 100 youths barged into their house & forcibly took their daughter Vaishali away. The accused also vandalised the house. pic.twitter.com/qlJuwU3voE
— ANI (@ANI) December 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ranga Reddy, Telangana | A woman has been kidnapped from her house at Adibatla. The woman’s parents alleged that around 100 youths barged into their house & forcibly took their daughter Vaishali away. The accused also vandalised the house. pic.twitter.com/qlJuwU3voE
— ANI (@ANI) December 9, 2022Ranga Reddy, Telangana | A woman has been kidnapped from her house at Adibatla. The woman’s parents alleged that around 100 youths barged into their house & forcibly took their daughter Vaishali away. The accused also vandalised the house. pic.twitter.com/qlJuwU3voE
— ANI (@ANI) December 9, 2022
पोलिसांच्या मदतीने अपहरण केल्याचा आरोप : मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांनी नवीन रेड्डी विरुद्ध आदिभटला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मुलींची छेड काढणाऱ्या नवीन रेड्डीवर पोलिसांच्या मदतीने अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यांनी सांगितले की, घरफोडीच्या वेळी 100 नंबरवर कॉल करूनही पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. पोलिसांच्या या कृतीचा पीडितांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. या घटनेमुळे मन्नेगुडा येथे तणावाचे वातावरण आहे. नवीन रेड्डी आणि तरुणीची आधीच ओळख होती. घटनास्थळी पोहोचलेले इब्राहिमपट्टणमचे एसीपी उमामहेश्वर राव यांनी पीडितांच्या तक्रारीच्या आधारे अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.