ETV Bharat / bharat

गूड न्यूज! यंदा सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा अंदाज! - monsoon 2021

ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये सामान्यपेक्षा कमी तर देशातील उर्वरीत भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गूड न्यूज! यंदा सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा अंदाज!

author img

By

Published : Apr 16, 2021, 1:50 PM IST

नवी दिल्ली : यंदा देशात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशात सरासरीच्या 98 टक्के पर्जन्यमान होऊ शकते. यात पाच टक्के कमी किंवा जास्त होऊ शकतात असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन यांनी सांगितले.

ओडिशा, झारखंड, पूर्व यूपीत कमी पाऊस

ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये सामान्यपेक्षा कमी तर देशातील उर्वरीत भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदा देशात मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 98 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज असून देशासाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी असल्याचे राजीवन आभासी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना म्हणाले.

सलग दोन वर्षे सामान्यपेक्षा जास्त पाऊस

येत्या चार महिन्यांत हवामान विभागाकडून महिन्यानुसार अंदाजही जाहीर केला जाईल असेही राजीवन यांनी यावेळेस सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून देशात सामान्यपेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. ला निना आणि एल निनोचा भारतीय मान्सूनच्या वाटचालीवर मोठा परिणाम होत असतो. यंदा एल निनोच्या प्रभावाची शक्यता कमी असल्याचे राजीवन म्हणाले.

अर्थव्यवस्थेसाठी मान्सूनची वाटचाल महत्वाची

देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मान्सूनची वाटचाल अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे मान्सूनचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून येतो. म्हणूनच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही ही गूड न्यूजच समजली जात आहे.

स्कायमेटचाही सामान्य मान्सूनचा अंदाज

देशात यंदा जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये एकूण सरासरीच्या 103 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. यात 5 टक्के कमी वा अधिक होऊ शकतात. मान्सूनच्या चार महिन्यांपैकी सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा सर्वात जास्त पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. स्कायमेटचे अध्यक्ष जी पी शर्मा यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

दुष्काळाची शक्यता शून्य टक्के

स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा देशात मान्सून सामान्य राहिल. यंदा दुष्काळाची शक्यता शून्य टक्के इतकी आहे. तर एकूण मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाची शक्यता 60 टक्के असल्याने पाऊस चांगलाच राहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या चार महिन्यांपैकी जूनमध्ये सरासरीच्या 106 टक्के पर्जन्यमानाचा, जुलैमध्ये सरासरीच्या 97 टक्के पर्जन्यमानाचा, ऑगस्टमध्ये सरासरीच्या 99 टक्के पर्जन्यमानाचा, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 116 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.