नवी दिल्ली - जंगलातील जीवन सोपे नाही. भूक मिटवण्यासाठी कुणी शिकारीच्या शोधात तर कोणी शिकार होण्यापासून स्व:ताचा बचाव करण्यासाठी येथे दररोज संघर्ष करतो. जंगलातील जीवना-मरणाचा संघर्ष दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल माध्यामांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी टि्वटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये माकड आणि बिबट्या यांच्यात अस्तित्वाची लढाई दिसत आहे. बिबट्याला आपली भूक मिटवण्यासाठी शिकार हवी आहे. तर दुसरीकडे माकड जीव वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.
-
Monkey was not happy with his date pic.twitter.com/mvHnHIfmTh
— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Monkey was not happy with his date pic.twitter.com/mvHnHIfmTh
— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 29, 2021Monkey was not happy with his date pic.twitter.com/mvHnHIfmTh
— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 29, 2021
वास्तविक बिबट्या हा माकडाला शिकार बनवण्यासाठी झाडावर चढलेला असतो. मात्र, बिबिट्यापासून बचाव करण्यासाठी माकड झाडांच्या उंच फाद्यांवर पोहचते आणि चकवा देते. बिबट्यादेखील चपळाई दाखवून माकडाला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण माकड अत्यंत हुशारीने आणि शितापीने स्व:ताचा बचाव करतो. माकडा या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत आपला जीव वाचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसते.
जगण्या आणि मरणाचा हा खेळ काही लोकांना चांगलाच भावला आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी हा व्हिडीओ पाहून माकडाच्या जगण्यासाठीचा संघर्ष अनेकांना आवडला आहे. मात्र, या संघर्षात कोण हरले आणि कोण जिंकले यावर नेटेकरी प्रश्न विचारत आहेत. पुढे या व्हिडिओमध्ये काय घडले हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत एकूण 20 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. तर 2500 पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या माकड आणि बिबट्या दोघांसाठीही जीवन खूप कठीण आहे. दोघांकडेही हार मानण्याचा पर्याय नाही. माकडाला आपला जीव वाचवायचा आहे, तर बिबट्यालाही त्याची भूक भागवायची आहे. एक प्रकारे, दोघांचा लढा खरोखर फक्त जिवंत राहण्यासाठी आहे.
हेही वाचा - Video : वन्यप्राण्यांना कळतंय मात्र आपल्याला कधी कळणार ?