भोपाळ - मध्य प्रदेशमधील मंडाला जिल्ह्यातील दारूच्या दुकानामध्ये दारू पिणाऱ्या माकडाचा अजब व्हिडिओ समोर आला आहे. मंडाला जिल्ह्यातील बामहानी बाजारमधील दारूच्या दुकानात माकड गेले. माकडाने थेट दारूची बाटली घेऊन प्यायला सुरुवात केली.
दारू पिणाऱ्या माकडाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. बिनधास्तपणे दारू पिणाऱ्या माकडाची नेटिझन्सही चर्चा करू लागले आहे. दरम्यान, माकडाला दारू प्यायला देणे, हा वन्यप्राणी संरक्ष कायदा 1972 नुसार गुन्हा आहे.