ETV Bharat / bharat

Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' अभियानासाठी मोहम्मद कासिमची प्रयागराज ते लखनौ पदयात्रा - रायबरेलीत मोहम्मद कासिम

'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान देशातील इतर नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी, हातात तिरंगा घेऊन प्रयागराजचा मोहम्मद कासिम (mohammad qasim foot march)पदयात्रा करीत, मंगळवारी पाचव्या दिवशी रायबरेलीला (mohammad qasim in raebareli) पोहोचला. घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी त्यांनी लोकांना जागरुक केले आहे.

Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा
author img

By

Published : Aug 9, 2022, 6:25 PM IST

रायबरेली : स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या (75 years of Indian Independence) निमित्ताने, उत्तर प्रदेश सरकारने देशातील जनतेला प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. प्रयागराजचे रहिवासी असलेले मोहम्मद कासिम, यांनी सरकारच्या या सूचनेचे पालन केले. 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान अंतर्गत, त्यांनी लोकांना जागरुक करण्यासाठी, हातात तिरंगा घेऊन प्रयागराज ते लखनौ अशी पदयात्रा (mohammad qasim foot march) सुरू केली. मंगळवारी मोहम्मद कासिम रायबरेली येथे (mohammad qasim in raebareli) पोहोचले. आपल्या देशाबद्दल लोकांच्या मनात प्रेम निर्माण करणे व त्यांना जागरुक करणे; हा या पदयात्रेचा उद्देश आहे, असे कासिम यांनी सांगितले.

हर घर तिरंगा

पदयात्रेच्या मार्गावर गावे, शहरे इत्यादी ठिकाणी जे लोक भेटतात, त्यांना मोहम्मद कासिम तिरंगा लावण्यासाठी जागरुक करतात. त्याचबरोबर त्यांनी सरकारच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. प्रयागराजचे मोहम्मद कासिम अहमद हे तिरंग्याचा कार्यक्रम घरोघरी, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदयात्रा करत आहेत. प्रयागराज ते लखनौ पदयात्रेला निघालेले मोहम्मद कासिम, मंगळवारी पाचव्या दिवशी रायबरेलीला पोहोचले आहे. तेथील लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

मोहम्मद कासिम अहमद यांनी सांगितले की, स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साजरे केले जाणारे, 'हर घर तिरंगा अभियान' घरोघरी घेऊन जायचे आहे. याअंतर्गत ते प्रयागराजहून लखनौला रवाना झाले आहेत. आमच्या आन-बान-शानने घरोघरी तिरंगा फडकावा, असा संदेश तो वाटेतल्या छोट्या गावांना देत आहे. ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानंतर ही संधी आली आहे, जेव्हा आपण घरोघरी तिरंगा फडकवू शकतो. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) यांचेही कौतुक केले.

हेही वाचा : 75 years of India independence : न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात स्वातंत्र्याची ७५ वर्षा निमित्त विविध कार्यक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.