चंदीगड : मोहालीच्या चंदीगड विद्यापीठात बनवलेले व्हिडिओ लीक आणि लीक झाल्याच्या प्रकरणातील बिघडलेली परिस्थिती पाहता, विद्यापीठ प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कॅम्पस 6 दिवसांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली ( mohali video leak campus shutdown for 6 days ) आहे. विद्यापीठातील कथित 'आक्षेपार्ह व्हिडिओ लीक' वादावर विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये निदर्शने केली. त्याचबरोबर या प्रकरणी 2 वॉर्डन निलंबित तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आरोपी विद्यार्थिनी, तिचा कथित प्रियकर आणि अन्य एकाचा समावेश आहे.
डीजीपीचे वक्तव्य : पंजाबचे डीजीपी म्हणाले, 'चंदीगड विद्यापीठ प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थिनी आणि 2 इतर हिमाचलमधील आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. यासाठी तीन सदस्यांचे विशेष तपास पथक ( SIT ) स्थापन करण्यात आले आहे. संघातील सर्व सदस्य महिला आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी गुरप्रीत देव यांच्या देखरेखीखाली हे पथक तपास करणार आहे.आज चंदीगड विद्यापीठ २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने सुट्टी जाहीर केल्यानंतर विद्यार्थी घराकडे निघताना दिसत होते. कथित एमएमएस घोटाळ्यानंतर चंदीगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला. नंतर या प्रकरणाने जोर धरला. त्यानंतर राजकारण सुरू झाले.
दोन निलंबित वॉर्डनपैकी एकाचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती आरोपी तरुणीला धमकावताना दिसली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीचे आंघोळ करतानाचे अनेक व्हिडिओ बनवले आणि ते तिच्या प्रियकराला पाठवले. तिचा प्रियकर शिमल्यात राहतो.
आरोपी मुलाने मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. आरोपी विद्यार्थिनीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराला शिमला येथून अटक केली. आरोपी तरुणाकडून 4 मोबाईल सापडले आहेत. प्रियकराला अटक केल्यानंतर 18 सप्टेंबरच्या रात्री पोलिसांनी शिमल्यात एका 31 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरोपी विद्यार्थ्याचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या हे व्हिडीओ कोणत्या उद्देशाने पाठवले गेले याचा शोध पोलीस घेत आहेत.
कॅनडातून धमकीचे फोन - दरम्यान, या प्रकरणी मुलींना कॅनडाहून धमकीचे फोन आले असल्याचा दावा काही विद्यार्थिंनींनी केला आहे. या प्रकरणी वाच्यता केल्यास तुमचे व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी कॅनडाहून आलेल्या फोनद्वारे करण्यात आल्याचे मुलींचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनी आणखीनच धास्तावल्या आहेत.