ETV Bharat / bharat

मोदी आणि आझाद : राज्यसभेच्या निरोपाचे राजकारण - नरेंद्र मोदी आणि गुलाम नबी आझाद न्यूज लेटेस्ट न्यूज

कॉंग्रेसचे बंडखोर नेते राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपदी बिनविरोध जिंकू देणार नव्हतेच. आणि जर त्यांच्या पसंतीचा अध्यक्ष निवडण्यात त्यांना अपयश आले तर कॉंग्रेसमध्ये दुफळी आणून ते त्यांना हवा असलेला अध्यक्ष बनवतील. त्यासाठी त्यांना वेगळा गट तयार करावा लागेल. या पार्श्वभूमीवर आझाद कदाचित मोदींशी चांगले संबंध ठेवतील.

मोदी आणि आझाद : राज्यसभेच्या निरोपाचे राजकारण

author img

By

Published : Mar 1, 2021, 7:35 PM IST

नवी दिल्ली -विधिमंडळातल्या सभासदांना निरोप देणे काही नवे नाही. पण राज्यसभेतून निवृत्त झालेले सभासद गुलाम नवी आझाद यांना त्यांच्या निरोपाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी वागणूक दिली आणि अभिवादन केले, ते खरोखर प्रभावी होते. जवळ जवळ एक महिन्यापूर्वी माजी विरोधी पक्ष नेते आझाद यांनी काँग्रेसपेक्षा पंतप्रधानांवरच जास्त भाष्य केले.

मोदींचा इतरांसाठी परिपाठ

नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत नेहमीप्रमाणे भावनिक भाषण करत असताना विरोधी पक्ष नेत्याबद्दल कसे बोलायचे हा इतरांसाठी परिपाठ घालून दिला. त्यांनी उल्लेख केला की आझाद हे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री असताना राजकारण आणि काश्मिरमधला हिंसाचार यात अडकलेल्या गुजराती पर्यटकांना त्यांनी कशी मदत केली. संसदेतल्या या निरोप समारंभाच्या सत्रात पूर्ण लक्ष आझादांवरच होते. खरे तर हा निरोप समारंभ राज्यसभेचे चार निवृत्त सभासद शेमशेर सिंग, नझिर अहमद, फयाझ अहमद आणि गुलाम नवी आझाद यांच्यासाठी होता.

मोदींच्या डोळ्यात अश्रू

विरोधी पक्ष नेत्याला निरोप देताना मोदींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि त्यांनी आझाद यांचे अतिशय कौतुकच केले. त्यांची स्तुतीच केली. कलम ३७० चा उल्लेख न करता मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की आता निरोप घेणारे हे सभासद हे त्यांच्या कार्यकाळात संसदेने घेतलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णयाचे भागीदार आहेत. आणि म्हणूनच आझाद यांनी आपल्या भाषणात कलम ३७० चा उल्लेख केला नाही. तसेच भाजपच्या अजेंड्यात न बसणाऱ्या गोष्टींचा उल्लेख टाळला. आता दिवसेंदिवस या निरोप समारंभाचा राजकीय निष्कर्ष स्पष्ट होत आहे. विशेष करून जी २३ नंतर काँग्रेसच्या सदस्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षात महत्त्वाचे राजकीय बदल करण्याच्या आपल्या अधिकारांचा वापर करा, असे सुचवले आहे.

मोदीेच्या स्तुतीमुळे काँग्रेसच्या संबधात फरक नाही

राजकारणात काहीच उत्स्फूर्त नसते आणि सगळ्या गोष्टी या ठरवून लिखित असतात, हे सत्य राजकीय वर्तुळात मान्यच आहे. रविवारी आझाद यांनी जम्मूमध्ये केलेल्या भाषणात त्यांचा पक्ष भाजपविरोधात मजबूत करण्याऐवजी मोदी आणि मोदींचा नम्र स्वभाव यावरच जोर होता. यामागे काही तरी महत्त्वाची घडामोड आहे, हेच स्पष्ट होते. आणि हे खरे असेल तर मग दोन नेते परस्परांकडून काय मिळवू पाहतायत ? राज्यसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून भाषण देत असताना, आझाद यांनी आपल्या तटस्थतेच्या तत्त्वांशी कधी तडजोड केली नाही. मग ते मोदींसाठी कशी भूमिका घेणार आहेत ? त्यांनी मोदींबद्दल काढलेल्या शब्दांमुळे त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध आणि गांधी कुटुंबाशी असलेली जवळीक अजिबात कमी झालेली नाही.

आझाद आता जी २३ चे नेते

मोदी आणि आझाद यांची एकमेकांबद्दल असलेली अपेक्षा पूर्ण होण्यातला परस्पर संबंधांतला मुद्दा शोधणे हे खूप रंजक ठरेल. विरोधी पक्षातला मुस्लिम चेहरा, वस्तुनिष्ठ तटस्थ, कट्टर राष्ट्रवादी आणि वादग्रस्त जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी असलेले आझाद आता जी २३ चे नेते आहेत. या सगळ्यांचे भांडवल मोदी कसे काय करणार आहेत ? शिवाय मोदींच्या आझाद यांच्याबद्दलच्या जिव्हाळ्याने त्यांना जास्त महत्वाचे बनवले गेले. जी २३ चे नेतृत्व आता आझाद करत आहेत आणि स्वतंत्र अस्तित्व असल्याचा दावा न करता एक नवीन परंतु तटस्थ राजकीय आघाडी उघडली आहे. त्यांच्याच नेतृत्वात याच गटाने जम्मू इथून आपली मोहीम सुरू केली असून, ही चार राज्यांत आणि पाँडेचरीच्या आगामी निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे.

भाजपवर राज्यातील नेतृत्वाचा दबाव

भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्याच्या एक दिवसानंतर जम्मूमध्ये या गटाने मेळावा आयोजित केला होता. दरम्यान, आसाममध्ये आपल्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रियांका गांधी प्रचार करत आहेत आणि निवडणुका असलेल्या आसाममध्ये आपल्या पहिल्या भेटीत प्रियांका गांधीसोबत जी २३ चे सदस्य दिसत नाहीत. जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यव्यवस्थेची पुन:स्थापना करण्यासाठी भाजपवर राज्यातील नेतृत्वाचा प्रचंड दबाव आहे. यामुळेच आझाद यांनी जम्मूमध्ये केलेले भाषण आणि शक्तिप्रदर्शन हे महत्त्वाचे ठरते. राज्यव्यवस्था पुन:स्थापित करण्याच्या बाबतीत आझाद यांच्या राजकीय खेळीमध्ये किती प्रासंगिकता आहे हे पाहणे एक रंजक ठरेल.

आझादांचे मोदींशी चांगले संबंध

कॉंग्रेसचे बंडखोर नेते राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपदी बिनविरोध जिंकू देणार नव्हतेच. आणि जर त्यांच्या पसंतीचा अध्यक्ष निवडण्यात त्यांना अपयश आले तर कॉंग्रेसमध्ये दुफळी आणून ते त्यांना हवा असलेला अध्यक्ष बनवतील. त्यासाठी त्यांना वेगळा गट तयार करावा लागेल. या पार्श्वभूमीवर आझाद कदाचित मोदींशी चांगले संबंध ठेवतील. पंतप्रधानांशी जवळीक वाढवतील. आपल्या राजकीय भाषणात आझाद पुन्हा पुन्हा मोदींचे नाव ज्या प्रमाणात घेत आहेत, त्यावरून ते त्यांच्यासाठी पर्याय खुले ठेवत आहेत, हेच दिसते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.