अहमदाबाद (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर (Prime Minister Modi Three Day Gujarat Tour) आहेत. दरम्यान पंतप्रधानांनी मोढेरा (Modhera Village in Gujarat) हे भारतातील पहिले सौरऊर्जेवर चालणारे गाव (Modhera became first solar powered village ) म्हणून घोषित केले. मोदींनी सुमारे 3,900 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन (Inauguration of Projects in Gujarat) आणि पायाभरणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोढेरा येथील मोधेश्वरी माता मंदिरात पूजा केली.
स्वप्न आज सत्यात उतरताना दिसत आहे - यावेळी पंतप्रधान म्हणाले की, आज मोढेरा, मेहसाणा आणि संपूर्ण उत्तर गुजरातमध्ये विकासाची नवी ऊर्जा संचारली आहे. वीज, पाणी ते रस्ते, रेल्वे, दुग्धव्यवसाय ते कौशल्य विकास आणि आरोग्याशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि आज पायाभरणी करण्यात आली. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात मोढेरा, सूर्या ग्रामबाबत चर्चा सुरू झाली आहे. डोळ्यांसमोर स्वप्नं सत्यात उतरतात असं कधीच वाटलं नव्हतं. ते स्वप्न आज सत्यात उतरताना दिसत आहे.
-
PM Modi reaches Modhera in Mehsana, Gujarat to inaugurate & lay the foundation stone of multiple projects pic.twitter.com/wuXqqSLxqj
— ANI (@ANI) October 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM Modi reaches Modhera in Mehsana, Gujarat to inaugurate & lay the foundation stone of multiple projects pic.twitter.com/wuXqqSLxqj
— ANI (@ANI) October 9, 2022PM Modi reaches Modhera in Mehsana, Gujarat to inaugurate & lay the foundation stone of multiple projects pic.twitter.com/wuXqqSLxqj
— ANI (@ANI) October 9, 2022
हाच गुजरातचा आदर्श - पंतप्रधान म्हणाले की, आतापर्यंत असे होते की सरकार वीज निर्मिती करत असे आणि जनता ती विकत घेत असे. केंद्र सरकार लोकांच्या घरावर सोलर पॅनल बसवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी त्यांच्या शेतात वीज निर्माण करतात. देशात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जात आहे. पीएम म्हणाले की, आक्रमणकर्त्यांनी मोढेराला शतकापूर्वी मातीत मिसळण्यासाठी काय केले नाही, ज्या मोढेरावर विविध अत्याचार झाले. तो मोढेरा आता आपल्या पौराणिक कथांबरोबरच आधुनिकतेसाठी जगात एक उदाहरण बनत आहे. हाच गुजरातचा आदर्श आहे, जो आज मोढेरामध्ये दिसते. गुजरातच्या कानाकोपऱ्यात तो उपस्थित आहे.
मोढेश्वरी माता मंदिरात प्रार्थना मोदींची प्रार्थना- पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. येथे ते 14,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या शुभारंभासह विविध जाहीर सभांमध्ये सहभागी होणार आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप) शासित गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. मोढेश्वरी माता मंदिरात प्रार्थना करण्यासोबतच पंतप्रधान मोढेरा येथील सूर्य मंदिरालाही भेट देतील.
जामनगरमध्ये 1,460 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन- "पंतप्रधान सोमवारी भरुच जिल्ह्यातील आमोद येथे असतील. जेथे ते 8000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे विविध प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील," असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. ते सोमवारी अहमदाबादमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 'मोदी शिक्षक संकुल' या शैक्षणिक संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद््घाटन करतील. हा प्रकल्प विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देईल. असे सांगण्यात आले आहे की, 'सोमवारी संध्याकाळी मोदी जामनगरमध्ये 1,460 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. मंगळवारी ते राजकोट जिल्ह्यातील जमकंदोर्ना येथे सभेला संबोधित करतील.