ETV Bharat / bharat

'मिलान 2' टी क्षेपणास्त्र लष्कराला बळकट करणार, बीडीएलसोबत संरक्षण मंत्रालयाचा करार

भारतीय संरक्षण मंत्रालयाने आज भारत डायनामिक्स लिमिटेडसोबत 1,188 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड लष्काराला 4,960 मिलान-2 टी अँटी-टँक क्षेपणास्त्रांचा पुरवठा करणार आहे.

भारतीय संरक्षण मंत्रालय
भारतीय संरक्षण मंत्रालय
author img

By

Published : Mar 20, 2021, 5:53 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या आणि चीनच्या आडमुठीपणामुळे भारताने आता सीमेवरील आपली बाजू बळकट करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय लष्काराची आणखी ताकद वाढणार आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने आज भारत डायनामिक्स लिमिटेडसोबत 1,188 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड लष्काराला 4,960 मिलान-2 टी अँटी-टँक क्षेपणास्त्रांचा पुरवठा करणार आहे. मिलान -2 टी ची निर्मिती फ्रान्सच्या संरक्षण कंपनीच्या परवान्याअंतर्गत बीडीएलद्वारे केली जाते.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. याचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. येथे भारताची दारुगोळा आणि क्षेपणास्त्र बनवले जातात. त्याची स्थापना 1970 साली झाली होती. बीडीएल ही भारताने विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी नोडल एजन्सी आहे. बीडीएलने पहिले क्षेपणास्त्र 'पृथ्वी' होते.

हेही वाचा - मराठा आरक्षण : अजून किती पिढ्या आरक्षण सुरू राहणार, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.