नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर ( Nirmala Sitharaman Union Budget 2022 ) केला आहे. दीड तास सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. यामध्ये कोरोनादरम्यान महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मोबाईल फोन, चार्जर, कपडे आदी वस्तू स्वस्त होणार आहे.
मोबाईल होणार स्वस्त
मोबाईल फोन, चार्जरचा ट्रान्सफार्मर व कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क घटवण्यात आले आहे. यामुळे मोबाईल फोन चार्जर स्वस्त होणार आहे. त्याचसोबत, देशात निर्माण होणारे मोबाईलही स्वस्त होतील. देशात मोबाईल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय झाले स्वस्त
- चामडे
- पादत्राणे
- विदेशी सामान
- शेतीशी संबंधित वस्तू
- कपडे
- पॉलिश केलेले डायमंड
- जेम्स अँड ज्वेलरी
- पॅकेजिंग डब्बे
- मोबाईल फोन
- मोबाईल चार्जर
काय झाले महाग
- कॅपिटल्स गुड्सवर आयात शुल्क सूट रद्द केली आहे. त्यामुळे यापुढे कॅपिटल्स गुड्सवर 7.5 टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे.
- छत्र्या
हेही वाचा - Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा, आता येणार 5G सुविधा