मुंबई - गेली दोन वर्ष कोरोना काळामुळे महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण जग शांत होत. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने संपुर्ण जग पुर्ववत होत आहे. राज यांच्या कालच्या सभेला शिवाजी पार्कवर जी गर्दी जमली होती ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांपेक्षा काही कमी नव्हती. शिवाजी पार्क पुर्णपणे माणसांच्या गर्दीने फुलुन गेले होते. (Raj Thackeray Speech Of Gudi Padva 2022) या सभेत राज यांनी राजकीय नेत्यांचेच नाही तर मतदारांचेही चांगलेच कान टोचले आहेत. राज म्हणाले, या सगळ्यात मोठी अडच आहे ती आपण मतदार म्हणून आपली जबाबदारी आणि भान हरवून बसलो आहोत. आणि म्हणून या राजकीय पक्षांचे फावते आहे अस निरीक्षण त्यांनी नोंदवल आहे. याचवेळी, तुम्हाला कुणीही आणि कसही फरफटत न्याव आणि तुम्हीही जाव अस म्हणत त्यांनी मतदार म्हणून स्वत:ला एकदा ओळखा अस आवाहनही यावेळी केले आहे.
शिवसेनेने मतदारांची फसवणूक केली - राज यांनी भाषणात सुरूवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निषाणा साधला. शिवसेनेने भाजपसोबत युती केली अन् (2019)च्या निवडणुका लढवल्या. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांच्या विरोधात निवडणुका लढवत होते. दरम्यान, प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, गृहमंत्री अमित शहा आले, यांच्या सभेत स्टेजवर उद्धव ठाकरे होते. (Raj Thackeray Speech at Shivaji Park) मात्र, त्यांनी कधीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबद बोलण झाल आहे, अशी उघड कबूली दिली नाही. मात्र, जेव्हा निवडणुका झाल्या अन् त्यांना वाटले की आपल्यामुळे सरकार अडकतय तेव्हा त्यांना या अडीच वर्षाचा साक्षात्कार झाला असा हल्ला राज यांनी केला. (Raj Thackeray Criticism Of Sharad Pawar) जनतेसाठी असणाऱ्या मुख्यमंत्रीपदाची बोलणी चार भींतीच्या आत कशी करता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मतदारांची फसवणुक जर कोणी केली असेल तर ती शिवसेनेने केली आहे असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
पक्ष बेफिकीरीने वागत असेल तर त्याला घरी बसवा - राज यांनी यावेळी फक्त राजकीय नेत्यांचा समाचार नाही घेतला तर मतदारांचेही चांगलेच कान टोचले आहेत. मतदारांना उद्देशून ते म्हणाले, सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे तुम्ही फार लवकर सगळा गोष्टी विसरता. हे लोक येतात, भाषण करतात, आश्वासन देतात आणि निघून जातात. (Point in Raj Thackeray's speech on Shivteertha) मात्र, तुम्ही काहीही लक्षात न घेता त्यांना मतदान करता त्यामुळे या लोकांचे फावले आहे. मात्र, तुम्ही जोपर्यंत यांना घरी बसवणार नाही तोपर्यंत हे वठणीवर येणार नाहीत असा घणाघात त्यांनी यावेळी केला. दरम्यान, कोणताही राजकीय पक्ष बेफिकीरीने वागत असेल तर त्याला घरी बसवण्याचे तुमचे काम आहे. जर उद्या मी बेफिकरीने वागलो तर मलाही तुम्ही खाली बसवायला हवे असही राज यावेळी म्हणाले आहेत.
तुम्हा मतदारांचे मला कौतुक वाटते - तुम्ही जर नादान होऊन कुणाच्या पाठीमागे जाणार असाल तर तुमची किंमत झिरो आहे. तुम्ही जर असेच वागणार असाला तर या जाकीय पक्षांसाठी तुम्ही फक्त एक दिवसासाठी आहात. बाकी कोण विचारतो तुम्हाला? याचवेळी खरच तुम्हा मतदारांचे मला कौतुक वाटते. ज्यांनी काम केल त्यांना बाजूला सारलं अन् ज्यांनी काम नाही केल त्यांना सत्तेत बसवल. असे म्हणत नाशिक महानगर पालिकेचे उदाहरण देत राज यांनी यावेळी मतदारांच्या भूमीकेबद्दल खंत व्यक्त केली. दरम्यान, जर अशी लफंगेगिरी करुनच सत्ता मिळवायची असेल तर आम्हीही तेच करु. मात्र, चांगुलपणाची अपेक्षा तुम्ही धरू नका असही मतदारांना राज यावेळी म्हणाले आहेत.
बाळासाहेबांनी त्यावेळी माझे ऐकले नाही - या लोकांच्या हातामध्ये सत्ता द्यायची आणि आम्ही फक्त भांडण पाहायची हेच सुरू आहे. परंतु, हे एक राज्य आहे. या राज्याची सत्ता आहे. आपण सत्तेच्या माध्यमातून काय-काय करु शकतो. जनतेला काय-काय देऊ शकतो. मात्र, तुम्ही सत्ता देताय कुणाला असा प्रश्नही राज यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आज माझ्या महाराष्ट्रातील जनतेचे काय प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्या होत आहेत. रोजगार नाही. यावर कुणीच बोलायला तयार नाही असे म्हणत, (1995)चा प्रसंग त्यांनी सांगितला. शिवसेना भाजपचे सरकार आले तेव्हा मी बाळासाहेब ठाकरे यांना म्हणालो होतो हे फुकट घरे देणे योग्य नाही. मात्र, बाळासाहेबांनी त्यावेळी माझे ऐकले नाही. फुकट घर दिली. परंतु, त्यावेळी फुकट घरे दिली म्हणून (1995)नंतर लोकांचे लोंढेच्या-लोंढे मुंबईत यायला लागली. त्यामुळे आज मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक या शहरांची अवस्था वाईट झाली आहे. अस निरीक्षणही राज यांनी नोंदवले आहे.
यशवंत नाही यशवंत जाधव हो - मुंबई महापालिकेतील यशवंत जाधव यांची ईडीने दोन दिवस चौकशी केली. काय मोजत होते दोन दिवस हे लोक. आजपर्यंत खा-खा पैसे खाल्ले या लोकांनी. मात्र, मुंबईत बकालपणा वाढतोय, रस्त्यावर गाडी चालवता येईना, गर्दीची समस्या, मात्र, तुमचे (मतदारांचे) याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या लोकांचे फावते आहे अशी खंत राज यांनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच, गेली कित्येक दिवसांपासून शिवसेनेच्या हातात मुंबई महानगर पालिका आहे त्यांनी काहीच केले नाही असा घणाघातही राज यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, पाकिस्तानची आपल्याला गरज नाही. मुंबईतील काही मदरशांच्या भागात ईडीची धाड टाका सगळ समोर येईल अस म्हणत येणाऱ्या काळात मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा इशाराच राज यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीला जातीयवाद हवा आहे - आज महाराष्ट्र राज्याचा विकास होत नाही याचे मुख्य कारण आपण जातीत अडकलो आहोत हे आहे. आपण जातीतून बाहेर पडून कधी हिंदू होणार आहोत? असा प्रश्न उपस्थित करत हा जातीयवाद कुणाला हवा आहे? (1999)ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असे म्हणत हा जातीयवाद शरद पवारांना हवा आहे असा थेट आरोप राज यांनी केला आहे. मात्र, आपण हा जातीय वाद असाच घेऊन बसलो तर आपली प्रगती होणार नाही, असही ते यावेळी म्हणाले आहेत. याचवेळी त्यांनी मतदारांना आपला स्वाभिमान गहान ठेऊ नका, मतदान सजगतेने करा असे आवाहनही केले आहे.
हेही वाचा - Bilateral talks : नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट