भोपाळ MLA Gave up Salary and Allowances : मध्य प्रदेशातील रतलाम विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या चेतन कश्यप यांनी श्रीमंत झाल्यावर आमदार पदासाठी मिळणारं वेतन आणि भत्ते घेण्यास स्पष्ट नकार दिलाय. माझ्याकडं देवानं दिलेलं सर्व काही आहे, त्यामुळं हे वेतन आणि भत्ता जनतेच्या उपयोगी पडायला हवा, असं त्यांनी म्हटलंय.
मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदार : गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत देशातील पहिल्या दहा श्रीमंत आमदारांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले चेतन कश्यप हे मध्य प्रदेश विधानसभेतील सर्वात श्रीमंत आमदार देखील आहेत. त्यांनी आपल्या निवडणूक अर्जात सध्या त्यांच्याकडं 294 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता असून वार्षिक उत्पन्न सुमारे 37 लाख रुपये असल्याचं नमूद केलं होतं.
पगार आणि भत्ते घेण्यास का दिला नकार : आमदार चेतन कश्यप यांनी वेतन आणि भत्ते परत करण्यामागील कारण सांगितलंय. ते म्हणाले, "जर देवानं आशीर्वाद दिला असेल, स्वत: लोकहिताचं काम करण्यास सक्षम आहे. मग आमदार म्हणून मिळणारा पगार, भत्ता किंवा पेन्शन का वापरायचं? हा पैसा सरकारनं जनतेच्या हितासाठी वापरायला हवा," असंही त्यांनी म्हटलंय.
'त्या' पैशाचा वापर जनहितासाठी व्हायला हवा : आमदार कश्यप म्हणतात, देशसेवा आणि जनहिताच्या उद्देशानं राजकारणात आलोय. तरुणपणापासून सामाजिक कार्यात वावरलेले कश्यप आजही सेवा कार्यात मग्न आहेत. ते म्हणतात की, "जर देवानं मला लोकांच्या उपयोगासाठी सक्षम बनवलंय. त्यामुळंच त्यांना दिलेलं पगार आणि भत्ता काढून घाव्या. याचा उपयोग सरकारनं जनतेच्या हितासाठी वापर करावा," असं कश्यप यांनी स्पष्टपणे म्हटलंय. आमदार चेतन कश्यप यांनी पगार आणि भत्ते न घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी मागील दोन्हीही वेळा वेतन आणि भत्ते घेतले नव्हते. सध्या ते मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. 2018 मध्ये त्यांचं नाव देशातील पहिल्या दहा आमदारांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते.
आमदारांना किती मिळतो पगार : प्रत्येक महिन्याला एका आमदाराला सुमारे 1 लाख 10 हजार रुपये पगार मिळतो. ज्यात पगार 30 हजार रुपये आहे. 35 हजार रुपये निवडणूक भत्ता दिला जातो. संगणक परिचालक आणि लेखन साहित्यासाठी 25 हजार रुपये दिले जातात.
हेही वाचा :