ETV Bharat / bharat

अभिनेते मिथून चक्रवर्ती भाजपात जाणार? मोदींसोबत एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता

author img

By

Published : Mar 6, 2021, 1:33 PM IST

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाकडून जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. यातच बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सरच्या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

मिथून चक्रवर्ती -मोदी
मिथून चक्रवर्ती -मोदी

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहते आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहे. भाजपाने राज्यात मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धडाका लावला आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाकडून जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. यातच बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सरच्या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर भव्य रॅली होणार आहे. या रॅलीत मिथून चक्रवर्ती उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. तसेच 16 फेब्रुवारीला मिथून चक्रवर्ती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, मिथून चक्रवर्ती यांनी सर्व दावे फेटाळले होते.

मिथून चक्रवर्ती राज्यसभेत खासदार होते -

मिथून चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसमधून पश्चिम बंगालकडून राज्यसभेत खासदार राहिले आहेत. मात्र ते राजकारणात फार रमत नसल्याचं दिसत होतं. शारदा चिट फंड प्रकरणात नाव आल्याने अवघ्या दोन वर्षातच त्यांनी राज्यसभा सभागृहाचा राजीनामा दिला. मिथून चक्रवर्ती हे सध्या वयाच्या सत्तरीत आहेत. गेली अनेक वर्षे सेलिब्रेटी राहिल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे.

गांगुली भाजपावासी ?

भाजपा गेल्या काही दिवसांपासून एका प्रसिद्ध चेहऱ्याच्या शोधात आहे. बीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिक्रेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भाजापात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. मात्र, गांगुलीकडून अद्याप याबाबत कोणतीहे स्पष्टीकरण देण्यात आले नाही, किंवा तसे कोणतेही सुचित वक्तव्य करण्यात आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर गांगुली भाजपावासी होतो का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे वक्तव्य सीपीआयएम नेते अशोक भट्टाचार्य यांनी केले होते.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.