हैदराबाद तेलंगणा माजी क्रिकेटपटू मिताली राज यांनी शनिवारी हैदराबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट Mithali Raj Meets JP Nadda घेतली. भाजप अध्यक्षांची भेट घेतल्यानंतरच भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज राजकीय डाव खेळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा तेलंगणा दौऱ्यावर आहेत. आज ते वारंगलमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माजी क्रिकेटपटू मितालीराज यांची शमशाबाद येथे नोव्हेटेल हॉटेलमध्ये भेट घेतली. जय प्रकाश नड्डा यांनी दिल्लीहून थेट विमानतळ गाठले आणि माजी महिला क्रिकेट लीजेंड मिताली राज यांची भेट घेतली.
-
Former cricketer Mithali Raj meets BJP national president JP Nadda in Hyderabad, Telangana. pic.twitter.com/WuvbdA4L9y
— ANI (@ANI) August 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Former cricketer Mithali Raj meets BJP national president JP Nadda in Hyderabad, Telangana. pic.twitter.com/WuvbdA4L9y
— ANI (@ANI) August 27, 2022Former cricketer Mithali Raj meets BJP national president JP Nadda in Hyderabad, Telangana. pic.twitter.com/WuvbdA4L9y
— ANI (@ANI) August 27, 2022
त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली खेळांना दिलेल्या पाठिंब्यावर चर्चा केली. यावेळी मितालीराज यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. नोवाटेल हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत केंद्रीय मंत्री किशन रेड्डी, खासदार लक्ष्मण आणि भाजपचे राज्य कार्य प्रभारी तरुण चुग सहभागी झाले होते.