हैदराबाद : जगभरातील संशोधकांच्या नजरा आज भारतावर खिळल्या आहेत. भारत आज चांद्रयान 3 ही मोहीम दुपारी 2.35 वाजता लाँच करणार आहे. चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाल्यास हे भारताचे सगळ्यात मोठे यश असेल. यापूर्वी भारताने चांद्रयान 2 ही मोहीम केली होती, मात्र दुर्दैवाने त्यात भारताला अपयश आले. मात्र चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 या मोहिमेत काय फरक आहे, याबाबतची माहिती ईटीव्ही भारतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
-
LVM3 M4/Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) July 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Mission Readiness Review is completed.
The board has authorised the launch.
The countdown begins tomorrow.
The launch can be viewed LIVE onhttps://t.co/5wOj8aimkHhttps://t.co/zugXQAY0c0https://t.co/u5b07tA9e5
DD National
from 14:00 Hrs. IST…
">LVM3 M4/Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) July 12, 2023
Mission Readiness Review is completed.
The board has authorised the launch.
The countdown begins tomorrow.
The launch can be viewed LIVE onhttps://t.co/5wOj8aimkHhttps://t.co/zugXQAY0c0https://t.co/u5b07tA9e5
DD National
from 14:00 Hrs. IST…LVM3 M4/Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) July 12, 2023
Mission Readiness Review is completed.
The board has authorised the launch.
The countdown begins tomorrow.
The launch can be viewed LIVE onhttps://t.co/5wOj8aimkHhttps://t.co/zugXQAY0c0https://t.co/u5b07tA9e5
DD National
from 14:00 Hrs. IST…
का आहे महत्त्वाचे मिशन चांद्रयान 3 : चांद्रयान 3 हे चांद्रयान 2 पेक्षा वेगळे कसे आहे, याबाबत ईटीव्ही भारतने मिशन चांद्रयानबद्दल रविशंकर विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक डॉ नंदकुमार चक्रधारी यांच्याशी बातचित केली आहे. प्राध्यापक नंदकुमार चक्रधारी यांनी भारतासाठी हे एक महत्त्वाचे मिशन असल्याचे स्पष्ट केले. जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत. या मोहिमेत आपण यशस्वी झालो तर भारतही चंद्रावर जाणाऱ्या देशांच्या यादीत सामील होईल. सध्या या देशांमध्ये अमेरिका, रशिया आणि चीन यांनी चंद्रयान मोहीम यशस्वी केली आहे.
चांद्रयान 3 चांद्रयान 2 पेक्षा कसे आहे आहे वेगळे : भारताने चांद्रयान 2 मोहीम लाँच केल्यानंतर त्यामध्ये अपयश आले. मात्र भारताने चांद्रयान 3 च्या मोहिमेची पुन्हा मोठ्या जोमाने तयारी केली आहे. चांद्रयान 3 हे चांद्रयान 2 चे प्रगत मॉडेल असल्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. चांद्रयान 2 मध्ये अनेक त्रुटी आढळल्या, चांद्रयान 3 मध्ये त्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. चांद्रयान 2 चे लँडिंग व्यवस्थित न झाल्याने तो क्रॅश झाला होता. विक्रम लँडर चंद्रावर उतरत असताना त्याला लँडिंग करताना फोटो काढावे लागले. त्या छायाचित्रांद्वारे लँडरला पृष्ठभागावर खडबडीतपणा नसावा, हे शोधून काढायचे होते. मात्र या कालावधीतच लँडर क्रॅश झाले. लँडिंगच्या वेळी थ्रस्टरचा वेग किंचित वाढल्याने लँडर उतरत असताना पृष्ठभागावरील अंतराचा अचूक अंदाज लावता आला नाही. त्यामुळे लँडिंगच्या वेळी लँडरचा वेग कमी होण्याऐवजी वाढल्याने ते क्रॅश झाले. चांद्रयान 3 च्या मोहिमेत ही कमतरता दूर करून सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात आले आहे.
कोणत्या उणीवा झाल्या दूर : चांद्रयान 2 मध्ये अनेक उणीवा असल्याचे मत डॉ. नंदकुमार चक्रधारी यांनी व्यक्त करत त्या उणीवा चांद्रयान 3 मध्ये दूर करण्यात आल्या आहेत. लँडिंगचे टार्गेट वाढवण्यात आले असून चांद्रयान 2 ची त्रिज्या अर्धा किलोमीटर बाय अर्धा किलोमीटर होती. मात्र चांद्रयान 3 मध्ये ते 2.5 किमीने वाढवून 4 किमी करण्यात आली आहे. लँडरवर चारही दिशांना सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. त्यामुळे ते चंद्रावर उतरेल, तेव्हा वीज निर्मिती करण्यास सक्षम असेल. यासोबतच लँडरचे पाय खूप मजबूत करण्यात आले आहेत. त्यामुळे लँडिंग करताना कोणतेही नुकसान होणार नसल्याची खबरदारी यावेळी घेण्यात आली आहे. चांद्रयान 2 च्या वेळी लँडरमध्ये पाच थ्रस्टर होते. पण चांद्रयान 3 मध्ये 5 ऐवजी 4 थ्रस्टर वापरण्यात आले आहेत. चांद्रयान 2 चे ऑर्बिटल मिशन अजूनही चांगले काम करत असून त्याद्वारे लँडिंग स्पॉटचे छायाचित्रण करण्यात आले आहे. ती छायाचित्रे चांद्रयान 3 च्या सॉफ्टवेअरमध्ये टाकण्यात आली आहेत. त्यामुळे लँडिंगच्या वेळी फोटोची तुलना करून लँडिंग सहज करता येईल, अशी शास्त्राज्ञांना अपेक्षा आहे.
चंद्रावर लँडिंगचे मोठे आव्हान : जगातील फक्त तीन देशांना आतापर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आले आहे. या 3 देशांनी निवडलेल्या लँडिंग स्पॉटवर उतरणे सोपे होते. पण चांद्रयान 3 साठी निवडण्यात आलेली जागा ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाभोवती आहे. त्यामुळे लँडिंगसाठी सुमारे 70 अंश अक्षांश निवडण्यात आले आहेत. येथे लँडर उतरवणे खूप आव्हानात्मक असते. चांद्रयान 3 उतरण्यासाठी निवडण्यात आलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्याची किरणे फारच कमी पडतात, तेथे पाण्याची शक्यता जास्त असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांना आहे.
हेही वाचा -