ETV Bharat / bharat

घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलाला घातल्या बांगड्या आणि महिलांचे कपडे - Shameful incident in sikar

एका अल्पवयीन मुलाला बांगड्या आणि महिलांचे कपडे घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजस्थानच्या सीकरमध्ये ही लज्जास्पद घटना घडली.

राजस्थान
राजस्थान
author img

By

Published : Jun 9, 2021, 8:02 PM IST

सीकर - राजस्थानच्या सीकरमध्ये एक लज्जास्पद घटना उघडकीस आली. एका अल्पवयीन मुलाला बांगड्या आणि महिलांचे कपडे घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडित मुलाच्या भावाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अल्पवयीन मुलाला घातल्या बांगड्या आणि महिलांचे कपडे

पीडित अल्पवयीन मुलगा जैतूसर गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. किशोरपुरामधील लोकांनी त्याला बंधक बनवून बांगड्या आणि महिलांचे कपडे घातले. तसेच त्यांनी याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओ पाहिल्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांना आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलाने त्यांच्या गावातील मुलीला पळवून नेले होते, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे बदला घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणताच खुलासा केला नाही. 7 जून 2021 ला पाटण ठाण्यात पीडिताच्या भावाने तक्रार दाखल केली होती. त्यावर तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केले, असे पाटन ठाण्याचे अधिकारी बृजेश सिंह तंवर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.