भिवानी- हरियाणाच्या भिवानीमध्ये एका अल्पवयीन कबड्डीपट्टू मुलीसोबत चालत्या रेल्वेमध्ये बलात्कार झाल्याची ( kabaddi player raped in train In Bhiwani ) घटना समोर आली आहे. चालत्या रेल्वेमध्ये टॉयलेटमध्ये अल्पवयीन खेळाडूसोबत बलात्काराची ( minor kabaddi player raped in train ) ही घटना घडली आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरुद्ध तोशाम पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल ( case of rape and poxo ) करण्यात आला आहे.
गुंगी आणणारे पदार्थ पाजले- ढांगर गावात ( Dhangar minor girl rape case ) राहणारा मोनू हा त्याच्या मुलीला कबड्डीच्या तयारीसाठी अकादमीत प्रवेश ( admission in an academy ) मिळवून देण्याच्या बहाण्याने फेब्रुवारी महिन्यात इंदूरला घेऊन गेला होता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मुलीला अकादमीतील वातावरण पसंत न आल्याने दोघेही दिल्लीला रेल्वेने गावी परतत होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने आपल्या मुलीला गुंगी आणणारे पदार्थ ( ingested drugs in food ) पाजले. यानंतर पुन्हा चालत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये बलात्कार केला.
मुलीला जीवे मारण्याची धमकी- पीडितेच्या आईने प्रथम कैरू पोलीस चौकीत तक्रार दिली. तक्रारीत महिलेने सांगितले की, तिची मोठी मुलगी बारावीत शिकते. याशिवाय ती कबड्डीपटूही आहे. पीडितेच्या आईचा आरोप आहे की, आरोपीने तिच्या मुलीला कोणाला काही न सांगण्याची धमकी दिली आहे. खूप विचारल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पीडितेच्या आईचा आरोप आहे की, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी तिला फोन करून मुलीला जीवे मारण्याची धमकी देत आहे.
महिला अधिकाऱ्याचा आरोपींशी संबंध - पीडितेच्या आईने दावा आहे की, तोशाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असूनही पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. त्याचवेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास करणार्या महिला अधिकाऱ्यावर आरोपींशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. आता पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणी १९ एप्रिलला आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.