दंतेवाडा(छत्तीसगड) - बारसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपेट गावातून 45 दिवसांचे नवजात बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. आता याच घटनेत पोलिसांनी बेपत्ता मुलाची हत्या करणाऱ्या त्याच्या अल्पवयीन वडिलांचे नाव उघड केले आहे. मुलाचे वडील आणि त्याची आई दोघेही अजून अल्पवयीन आहेत. त्यामुळे लग्नानंतर लगेच आपत्य झाल्याचे दु:ख त्या आरोपी वडिलांना होते.
यूट्यूब पाहून बनवला हत्येचा प्लॅन - आरोपी वडिलाने आधी मुलाचे अपहरण केले. त्यानंतर आपल्या मुलाला गावाबाहेर एका पुलाखाली लपवून ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाला जवळच्या तलावात फेकून मारले. हा सर्व प्लॅन आरोपी वडिलाने यूट्यूबवर बघून तयार केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
गुन्हा लपवण्याचा प्रयत्न - पोलिसांना व गावकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून वडिलाने मुलाचा गमजा व कमरेला बांधलेला काळा दोरा आपल्याच घराजवळील शेतात फेकून दिला. त्यानंतर एक कोंबडी मारून तिचे रक्त धाग्याभोवती टाकले. जेणेकरून लोकांना समजेल की एखाद्या जंगली प्राण्याने मुलाला उचलून नेले आणि मारले. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी वडील अटकेत - दंतेवाडा एसपी सिद्धार्थ तिवारी म्हणाले, आम्हाला मिळालेल्या पुराव्यांवरून हे एक संशयास्पद प्रकरण असल्याचे दिसते. मुलगा आईसोबत घरात झोपला होता आणि घरातील सदस्य बाहेर झोपले होते. रक्ताने माखलेला एक गमजा तिथे सापडला, ज्यामुळे लोक असा विचार करत होते की कोणीतरी जंगली प्राणी मुलाला घेऊन गेले व ठार केले. मात्र, तपासानंतर हे प्रकरण वेगळ्याच दिशेने गेले व आरोपीने खरी माहिती पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा सातत्याने तपास केल्यावर आरोपी वडिलाला अटक केली आहे.
हेही वाचा - Nude Photo on Fake Insta ID : फेक इंस्टाग्राम अकाऊंटवर अश्लील फोटो अपलोड; मुलीची आत्महत्या