मुंबई शिंदे भाजपा सरकारमध्ये नव्या 23 मंत्र्यांचा लवकरच समावेश 23 new ministers will included in maharashtra cabinet होणार असल्याची माहिती भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मंत्री मंडळात आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
जळगाव जिल्ह्याच्या विकासासंदर्भात नवीन सरकारच्या चांगल्या योजना असल्याचे आश्वासन भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिले होते. त्याचबरोबर हे डबल इंजिनचे सरकार असल्याने राज्याचा विकास जोरात होईल. दरम्यान, काल पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना, पक्षाला वाटले असेल मी पदाला योग्य नाही. त्यामुळे मला पद मिळाले नसेल. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, आताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा ताईंना स्थान मिळणार का, तसेच त्यांच्या नाराजीबाबत विचारले असता, त्यांनी याबाबत निश्चितच योग्य मार्ग निघेल. ते म्हणाले की, पंकजा ताई पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निश्चितच गांभीर्याने योग्य विचार करतील. त्या नाराज आहेत, असे आम्हाला वाटत नाही. तसेच मंत्रिमंडळ विस्तार अजून बाकी आहे. त्यामुळे आणखी बरेच जणांना संधी मिळणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचे कारण नाही.
शिंदे गटाच्या नेत्यांनी दाखविली नाराजी आजकाल सिनियारिटी काही राहिली नाही राव, अतुल सावे यांच्या वडिलांसोबत राजकारणात होतो. मात्र अतुल सावे आले पहिले राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री झाले. जरा आमच्याकडे पण पहा की जरा अशी टोलेबाजी त्यांनी करत आपल्या मनातील दुःख बोलून दाखवले आहे. असे वक्तव्य करुन संजय शिरसाट यांनी शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. एकनाथ शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला. त्यात औरंगाबादेतून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट Mla Sanjay Shirsat यांचा निश्चित मानले जात होते. मात्र ऐनवेळी शिरसाट यांचा पत्ता कट झाला. तेव्हापासून ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे नाराजी दाखवून देत आहेत.