डेहराडून - उत्तराखंडमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना हरक सिंह रावत यांनी राजीनामा दिल्याची पुष्टी दिली आहे
उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ जवळ आलेली असताना उत्तराखंडमध्ये राजकीय समीकरणे बदलत आहेत. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या नाराजीने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
ईटीव्ही भारतशी बोलताना हरक सिंह रावत म्हणाले, की माझे तब्येत खराब आहे. तसेच राज्याच्या विकासासाठी मंत्रीपद छोटे आहे. त्यामुळे मी मंत्रीपद सोडले आहे. गेल्या ५ वर्षापासून मी वैद्यकीय रुग्णालयाची मागणी करत आहे. मात्र, त्यावर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मला राजीनामा देणे योग्य वाटले.
काँग्रेसच्या वाट्यावर रावत
कोटद्वारला वैद्यकीय रुग्णालय मिळाले नसल्याने हरक सिंह रावत नाराज होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सुत्राच्या माहितीनुसार हरक सिंह रावत हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा-MIG 21 Accindent in Jaisalmer : मिग-२१ जैसलमेरमध्ये कोसळले; वैमानिकाचा मृत्यू
भाजपचे प्रदेश अध्यक्ष कौशिक यांना राजीनाम्याची कल्पना नाही
उत्तराखंड भाजपचे प्रदेश अध्यक्ष मदन कौशिक म्हणाले, की हरक सिंह रावत यांच्या राजीनाम्याविषयी कोणतीही माहिती नाही. कोटद्वारमधील वैद्यकीय रुग्णालयावरून ते नाराज होते. पक्षासाठी हे काही ठीक नाही. सध्या मी गोपेश्वर येथे आहे. सर्व काम सोडून सकाळी देहरादूनला पोहोचणार आहे.
हेही वाचा-Exclusive Interview With Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्स हरनाझ संधूने तरुणांना दिला 'हा' कानमंत्र
हरक सिंह रावत हे उत्तराखंडमधील प्रभावशाली नेते
हरक सिंह रावत हे उत्तराखंडमधील प्रभावशाली नेते आहेत. त्यांनी 2016 मध्ये बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काही महिन्यांपासून हरक सिंह रावत हे बंडखोरीच्या पावित्र्यात होते. त्यामुळे त्यांना दिल्लीला पक्षाकडून बोलावणे आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी शांततेचे वातावरण झालेले असताना अचानक त्यांनी राजीनामा दिला आहे.