ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींनी मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीची केली चौकशी; फोनवरून साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे महान आणि दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांच्या तब्यतेची चौकशी केली. गुरुवारी अचानक तब्येत बिघडल्यानंतर मिल्खा सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मिल्खा सिंग-पंतप्रधान मोदी
मिल्खा सिंग-पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Jun 4, 2021, 5:29 PM IST

नवी दिल्ली - भारताचे महान आणि दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. गुरुवारी अचानक तब्येत बिघडल्यानंतर मिल्खा सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच पंतप्रधान मोदींनी फोन करून त्यांच्या तब्यतेची चौकशी केली. मिल्खा सिंग लवकरच स्वस्थ होऊन टोकियो ऑलम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्साहीत करतील, अशी आशा पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केली.

मिल्खा सिंग यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मोहालीमधील फोर्टीस रुग्णालयात उपचार झाले. मिल्खा यांनी स्वत: कोरोनाची लागण झाल्याची माहिती शेअर केली होती. ते घरातच क्वारंटाईन होते. मात्र, 24 मेला अचानक ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर त्यांना फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना 30 मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, घरी आल्यानंतर गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांना पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचीही ऑक्सिजन पातळी कमी झाली असून त्या आयसीयूमध्ये आहेत.

फ्लाइंग शिख यांच्याविषयी...

फ्लाइंग शिख अशी मिल्खा सिंग यांची ओळख आहे. मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू आहेत. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. 1958 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले.1930 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 400 मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये ते चौथ्या स्थानावर आले होते. त्यांना फ्लाइंग सिक्ख असे टोपणनाव मिळालेले आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेला भाग मिल्खा भाग हा हिंदी चित्रपट मिल्खा सिंग यांच्या चरित्रकथेवर आधारित आहे. मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र द रेस ऑफ माय लाइफ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.